Maharashtra Muslim MLA: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसह अनेक राज्यात पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये अनेक मुस्लिम उमेदवारांनी विजय मिळवला आहे. महाराष्ट्रात महायुतीचे तर झारखंडमध्ये झामुमोटची सत्ता कायम राहिली आहे. दरम्य़ान आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है या नाऱ्यातही किती मुस्लिम उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. पाहा संपूर्ण यादी..
या निवडणुकीत भारताच्या राजकारणात आपली छाप सोडणारे इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्यासह अनेक दिग्गज नेत्य़ांना पराभवाचा सामना करावा लागला तर अनेक नेत्यांनी आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. यामध्ये सर्वात पहिले नाव आहे, अबू आसिम आझमी यांचे आहे. त्यांनी आपल्य़ा विजयाचा चौकार लगावला आहे.
मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी यांनी एमआयएमचे उमेदवार अतिक अहमद खान यांचा १२ हजार ७५३ मतांनी पराभव केला पराभव केला. आझमी यांना ६४ हजार ७८० मते मिळाली. तर अतिक खान यांना ४२ हजार २७ मते मिळाली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार नवाब मलिक यांना तिसऱ्या नंबरची केवळ १५ हजाराच्या आसपास मते मिळाली.
कागल विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री व राष्ट्रवादीचे (अजित गट) उमेदवार हसन मुश्रीफ विजयी झाले. त्यांनी शरद पवार गटाचे समरजीत सिंह घाटगे यांचा ११ हजार ५८१ मतांनी पराभव केला.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस कासम शेख विजयी झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार संतोष मंजे शेट्टी यांचा ५२ हजार १५ मतांनी पराभव केला.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे एकमेव मुस्लिम उमेदवार (उद्धव गट) हारून खान यांनी भाजप उमेदवार डॉ. भारती लवेकर यांचा १ हजार ६०० मतांनी पराभव केला.
माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार सना मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद गट) उमेदवार आणि स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांचा ३ हजार ३७८ मतांनी पराभव केला.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांनी भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांचा १ हजार २८३ मतांनी पराभव केला.
मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार विनोद शेलार यांचा ६ हजार २२७ मतांनी पराभव केल.
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख रशीद यांचा पराभव केला.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमीन पटेल यांनी काँग्रेसच्या चिन्हावर शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांचा ३४ हजार ८८४ मतांनी पराभव केला आहे.
सिल्लोड विधानसभा जागेवर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे उमेदवार सुरेश बनकर यांचा २४२० मतांनी पराभव केला.