मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 9, 2024: मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून कुकर, साड्यांचे वाटप; पोलिसांमध्ये तक्रार
Maharashtra Election News LIVE November 9, 2024: मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून कुकर, साड्यांचे वाटप; पोलिसांमध्ये तक्रार
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 09 Nov 202403:48 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराकडून कुकर, साड्यांचे वाटप; पोलिसांमध्ये तक्रार
Chandivali Assembly Constituency : चांदिवली विधानसभा क्षेत्रातील गणेश नगर येथील मिनी पंजाब हॉटेल येथे मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रेशर कुकर, साड्या, हॉटपॉट व विविध भेट वस्तू वाटप केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
Aaditya Thackeray On Eknath Shinde : मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अयोध्येवरुनच पळून जाण्याची योजना होती. उद्धव ठाकरे यांना या सर्व गोष्टी माहिती असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच यासाठी बऱ्याच आधीपासून तयारी सुरु असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे पत्ते खोलले..! म्हणाले ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही आमच्या पक्षाची भूमिका
Sharad Pawar On CM Post : शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्व घटक पङ एकत्र बसू, ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ.
महाराष्ट्र बातम्या News Live: पोर्शे प्रकरणी बदनामी केली तर तर कोर्टात खेचेन! आमदार सुनील टिंगरेकडून शरद पवारांना नोटीस
Sunil Tingre send notice to Sharad Pawar : पोर्शे अपघात प्रकरणी बदनामी केल्यास तर कोर्टात खेचेन अशी नोटिस आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना पाठवल्याचा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: सांगली हादरले! भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर खाडे यांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या
Sangli Sudhar Khade Murder : भाजपाचे नेते सुधारक खाडे यांची निर्घृण हत्येमुळे सांगली जिल्हा हादरला आहे. ऐन निवडणूक काळात ही हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात! भरधाव बस ट्रकला धडकली; ८ जणांची प्रकृती चिंताजनक, पहाटे घडली घटना
mumbai pune expressway accident : मुंबई पुणे एक्सपेसवे वर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. भरधाव बस ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला आहे. यात ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Asim Sarode : सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंमत दाखवण्यात सरन्यायाधीश कमजोर ठरले; अॅड. असीम सरोदे यांची टीका
Asim Sarode on CJI Chandrachud : सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्यकाळात ते वादग्रस्त ठरले. सामाजिक करकर्ते व वकील अॅड. असीम सरोदे यांनी त्यांच्या कार्यकाळावर टीका केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे मोठं षडयंत्र! ‘या’ कारणांसाठी करण्यात आली हत्या, मुलगी पूनम यांचा मोठा दावा
Poonam Mahajan on Pramod Mahajan Murder : प्रमोद महाजन यांची २२ एप्रिल २००६ रोजी वरळी येथील राहत्या घरी त्यांचे धाकटे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांचं ३ मे रोजी निधन झालं होतं.