मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 5, 2024: Bkc मध्ये उद्या महाविकास आघाडीची प्रचारसभा; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल, असा असेल पर्यायी मार्ग
Maharashtra Election News LIVE November 5, 2024: BKC मध्ये उद्या महाविकास आघाडीची प्रचारसभा; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल, असा असेल पर्यायी मार्ग
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 05 Nov 202403:39 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: BKC मध्ये उद्या महाविकास आघाडीची प्रचारसभा; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल, असा असेल पर्यायी मार्ग
Mumbai traffic Advisory : बुधवारी सायंकाळी ५ वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा’ होणार असून या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून काही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: सतेज पाटलांच्या नाराजीनंतर शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? छत्रपतींनी निवेदन प्रसिद्ध करत केला खुलासा
Kolhapur Politics : सतेज पाटलांनी शाहू महाराजांचा अपमान केला व शाहू महाराज काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देणार असे बोलले जात आहे. यावर शाहू महाराजांनी निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मोदी-शहांनी शेतकरीविरोधी कायदे क्रूरपणे राबविल्याने महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढल्याः शेतकरी नेत्याचा आरोप
केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेले शेतकरीविरोधी कायदे रद्द केले नाहीत. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप शेतकरी नेते, किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: फडणवीसांच्या 'उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर सतेज पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर, आधीपासूनच सर्वच काढलं..
Satej Patil On Devendra Fadnavis : उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालेली आहे. फडणवीसांच्या प्रश्नावर सतेज पाटलांनी म्हटलं की, मला वाटतं आता महाराष्ट्रातील जनता महायुतीला गायब करेल. २० तारखेला मतदान झाल्यावर हे त्यांना लक्षात येईलच.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार; राज्यसभाही लढवणार नाही, बारामतीतील प्रचारसभेत दिले संकेत
Sharad Pawar Retirement: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत मोठ वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी वर्णी!
ips sanjay varma new dig of Maharashtra : राज्याच्या पोलिस महासंचलिका रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बदली झाल्यावर राज्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा याची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: विधानसभेच्या तोंडावर भाजपला धक्का! नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावीत यांचा पक्षाला रामराम; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Heena gavit gave BJP Resign : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबार जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी खासदार हिना गावीत यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मराठी बोलण्यास नकार देत तिकिट चेकरची अरेरावी! प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या केले हवाली; मुंबईच्या नालासोपारा येथील घटना
Nalasopara News : मुंबईत काही दिवसांपुरी एका टीसीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात मराठी द्वेष करत असल्याचं आढळलं होतं. त्याच प्रकारे नालासोपारा येथे देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मराठी बोलण्यास नकार देत टीसीने प्रवाशाला पोलिसांच्या हवाली करत मराठीची सक्ती करणार नाही असे लिहून घेतले.
महाराष्ट्र बातम्या News Live: भल्याभल्यांना बिनधास्त भिडणारे सतेज पाटील लहान मुलासारखे रडले! कोल्हापुरातील उमेदवाराची माघार जिव्हारी
Kolhapur North Constituency Politics : उत्तर कोल्हापुरात अर्ज माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसने मधुरिमाराजे यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी अचानक माघार घेतल्याने काँग्रेससह सतेज पाटील यांना जबर धक्का बसला.
महाराष्ट्र बातम्या News Live: अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेलं...उत्तेजक गोळ्या घेऊन अत्याचार करतांना एकाचा मृत्यू! मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Crime news : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेलं. तसेच त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करत असतांना त्याचा मृत्यू झाला. उत्तेजक गोळ्या घेतल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात गुलाबी थंडीची चाहूल! काही जिल्ह्यात तापमानात घट! मुंबई, पुण्यात उकाडा वाढला
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. काही जिल्ह्यातील कमाल तापमानात घट झाल्याचं आढळून आलं. तर काही ठिकाणी सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि रात्री थंडी असं वातावरण अनुभवायला मिळत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे जिल्ह्यात हाय व्हॉल्टेज ड्रामा! बंडखोरांनी वाढवले टेन्शन; जाणून घ्या २१ मतदार संघातील उमेदवारांची फायनल यादी
vidhan sabha election : पुणे जिल्ह्यात अर्ज माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली तर काही ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत लढण्याचा निर्धार केला आहे.