मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 30, 2024: मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट!
Maharashtra Election News LIVE November 30, 2024: मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट!
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 30 Nov 202404:25 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार? अजित पवारांनी केलं स्पष्ट!
Ajit Pawar On Maharashtra CM: मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत पेच सुरू असताना अजित पवार यांनी राज्यातील मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार आणि उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार, यावर भाष्य केले.
महाराष्ट्र बातम्या News Live: Fact Check: निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्या; मोदींच्या 'त्या' व्हिडिओमागील सत्य समोर!
PM Modi Viral Video: सध्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ते निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी करत आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यात 5 तारखेपर्यंत नवे सरकार स्थापन होणार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत फडणवीस आघाडीवर; भाजप नेत्याचा दावा
Maharashtra government formation: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सात दिवस झाले आहेत. मात्र, अजूनही नव्या सरकार स्थापनेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
महाराष्ट्र बातम्या News Live: कॅन्सरशी झुंजणाऱ्या वडिलांना लष्करानं दिली साथ! मुलाने एनडीएमध्ये गोल्ड मेडल जिंकत मानले लष्कराचे आभार
NDA Passing out parade 2024 : वडील कॅन्सरने आजारी असतांना लष्कराने दिलेल्या महागड्या आरोग्य सेवेमुळं भारवलेल्या मुलाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करत गोल्ड मेडल मिळवत प्रथम आला.
महाराष्ट्र बातम्या News Live: Solapur: राम सातपूतेंना मिळालेली मते मार्कडवाडी ग्रामस्थांना मान्य नाहीत, बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेणार!
Malshiras Assembly constituency Result: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी गावातील मतदारांना भाजपच्या राम सातपुते यांना मिळालेल्या मते अमान्य असून त्यांनी बॅलेटपेपरवर पुन्हा निवडणुक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local Train Sunday megablock : रविवारी तांत्रिक कामासाठी रेल्वेने मेगा ब्लॉक घोषित केला आहे. तिन्ही मार्गावर ब्लॉक राहणार असून या दरम्यान, अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेळापत्रक पाहून मुंबईकरांना बाहेर पाडण्याचे नियोजन करावे लागणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा; आंदोलनस्थळी जाऊन भेट घेत म्हणाले....
Sharad Pawar: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी पहाटे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुणेकरांना दिलासा! हेल्मेटसक्ती फक्त हायवेसाठी, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केलं स्पष्ट
Pune Helmet News: पुण्यासह राज्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेला प्रवासी अशा दोघांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ही कारवाई शहरात करण्यात येणार नसून फक्त महामार्गावर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: हडपसर मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करा! प्रशांत जगतापांनी अर्ज करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भरले तब्बल १२ लाख ७४ हजार
Hadapsar Assembly Constituency : राज्यात हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी प्रशांत जगताप यांनी केली आहे. या साठी त्यांनी मोठी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली आहे.