मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 24, 2024: Viral News: गुगल मॅप्सनं दाखवलेला मार्गामुळं ३ मित्रांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? वाचा
Maharashtra Election News LIVE November 24, 2024: Viral News: गुगल मॅप्सनं दाखवलेला मार्गामुळं ३ मित्रांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? वाचा
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 24 Nov 202404:36 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Viral News: गुगल मॅप्सनं दाखवलेला मार्गामुळं ३ मित्रांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? वाचा
Madhya Pradesh Car Accident News: गुगल मॅप किंवा जीपीएसने चुकीचा मार्ग दाखवल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: खरी राष्ट्र्रवादी कोणाची? शरद पवार म्हणाले अजित पवार गटाने अधिक जागा जिंकल्या पण..
Sharad Pawar :अजित पवारांच्या गटाने जास्त जागा जिंकल्या हे मान्य करायला मला काहीच हरकत नाही. पण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा खरा संस्थापक कोण हे तुम्हा सर्वांना माहित आहे, असे म्हणत शरद पवार यांनी खरी राष्ट्रवादी कोणाची याचा फैसला सुनावला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना पत्र; म्हणाले, 'या विजयाचे खरे शिल्पकार....'
Devendra Fadanvis letter : देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात, छगन भुजबळांच्या वक्तव्यानं राजकारणात खळबळ!
Maharashtra Next CM: माजी मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : ‘पण मी घरी बसणार नाही..’ विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar on Election Result : काल निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी विधानसभा निकालावर दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mahayuti: महायुतीत संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम, उद्याच शपथविधीची शक्यता
mahayuti Goverment : नव्या सरकारचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता असून या सोहळ्यात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतील. मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांच्या नावांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवार, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांचं आता काय होणार? राज्यसभेचा मार्ग झाला बंद, समजून घ्या समीकरण
Maharashtra Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा जिंकता आल्या. महाविकास आघाडीच्या या अपयशामुळे शरद पवार, संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची पुढची टर्म स्वबळावर मिळणार नाही.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Result : भाजपविरुद्धच्या थेट लढाईत काँग्रेस पुन्हा एकदा चारी मुंड्या चीत; ७५ पैकी ६५ जागांवर पराभूत
Maharashtra Election Result : काँग्रेसचा थेट सामना भाजपशी होता, तेथे भाजपचा वरचष्मा राहिला असून काँग्रेस फेल ठरली आहे. हरियाणानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मिनी मंत्रालय ते थेट विधानसभा! पुणे जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांची आमदारपदी वर्णी; ‘या’ दिग्गजांना केलं पराभूत
Maharashtra vidhan sabha election results : पुण्यात २१ मतदार संघात धक्कादायक निकाल लागले. २१ पैकी १८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. मिनी विधान सभा सजमल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तीन माजी सदस्यांनी आमदारकीच्या लढतीत दिग्गजांना पराभूत केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेईमानी करायची नाही; निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया
Manoj Jarange Patil on Election Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मराठा अरक्षणावर भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: विधानसभेचे निकाल लागले; आता नवे सरकार कधी येणार ? सत्तास्थापनेची काय असते प्रक्रिया ? वाचा
Maharashtra Vidhan Sabha Election Results: महाराष्ट्रात जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करणार आहे. सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया काय असते जाणून घेऊयात.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज ठाकरेंची भूमिका उद्धव यांच्या पथ्थ्यावर, MNS निवडणुकीच्या मैदानात नसती तर आदित्य ठाकरेंसह ‘या’ १० जागा होत्या संकटात
Maharashtra Result 2024 : महाराष्ट्रात भाजपने चमकदार कामगिरी करत १४९ पैकी १३२ जागा जिंकल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या.
महाराष्ट्र बातम्या News Live: माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय! विधानसभा निकालानंतर राऊतांचा मोठा आरोप
Sanjay Raut on cji chandrachud : राज्यात महाविकास आघाडीच्या पराभवासाठी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जबाबदार असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: विधानसभा निवडणुकीच्या परीक्षेत महायुती मेरीटमध्ये तर महाविकास आघाडी नापास; कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ? वाचा
Maharashtra Assembly Election 2024 Final Results Party wise : राज्यात शनिवारी विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीने या निवडणुकीत बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, पाहुयात..
महाराष्ट्र बातम्या News Live: Video : कोल्हापुराच्या चंदगडमध्ये आमदाराच्या विजयी मिरवणुकीत गुलाल उधळताच आगीचा भडका! महिलांसह काही कार्यकर्ते जखमी
Kolhapur Chandgad News : कोल्हापुराच्या चंदगडमध्ये मोठी दुर्घटना घडली असून येथील विजयी आमदार शिवाजी पाटील यांच्या विजयी मिरवणुकीत गुलाल उधळताना आगीचा भडका उडाला असून यात काही जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: कोणत्या मतदार संघात कुणी मारली बाजी ? महाराष्ट्रातील २८८ नवनिर्वाचित आमदारांची यादी वाचा एका क्लिकवर
Maharashtra 288 assembly constituency winner candidate list : राज्यात महायुतीचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहे. बहुतांश जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांचा विजय! अतितटीच्या लढतीत केवळ १४५७ मतांनी विजय खेचून आणला
Nanded Loksabha Election : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत अतिटतीच्या लढतीत शेवटच्या क्षणी मोठा उलटफेर झाला. सुरवाती पासून मागे असलेल्या काँग्रेसच्या रवींद्र चव्हाण यांनी १४५७ मतांनी विजय मिळवला.
महाराष्ट्र बातम्या News Live: शिंदे, फडणवीस, की अजित पवार ? महाराष्ट्रचा मुख्यमंत्री कोण होणार?; आरएसएसची 'या' नावाला पसंती
who will be next CM Of Maharashtra : महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा समावेश आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदावरून युतीत काही मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यात सर्वाधिक मते कुणाला मिळाली? अजित पावर कितव्या क्रमांकावर? वाचा टॉप १० आमदारांची यादी
Maharashtra Assembly Election Top 10 MLA : राज्यात आता पर्यंत अजित पवार हे सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक येणाऱ्या आमदारांमध्ये पहिल्या क्रमांकावर असायचे. मात्र, त्यांना हा रेकॉर्ड कायम राखता आला नाही.