मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 23, 2024: स्वत:ला पिछाडीवर पाहून घाबरलो! १ लाख मतांनी जिंकणाऱ्या अजित पवारांनी सांगितला आजचा किस्सा
Maharashtra Election News LIVE November 23, 2024: स्वत:ला पिछाडीवर पाहून घाबरलो! १ लाख मतांनी जिंकणाऱ्या अजित पवारांनी सांगितला आजचा किस्सा
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 23 Nov 202405:25 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: स्वत:ला पिछाडीवर पाहून घाबरलो! १ लाख मतांनी जिंकणाऱ्या अजित पवारांनी सांगितला आजचा किस्सा
Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले.
महाराष्ट्र बातम्या News Live: ओवैसींच्या एमआयएमने महाराष्ट्रात खातं उघडलं, ‘या’ मतदारसंघातील उमेदवार अवघ्या ८४ मतांनी विजयी..
Malegaon Assembly Election Result : मुस्लीम समाजाचे वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ एमआयएमला राखण्यात यश आले आहे. मुफ्ती यांचा केवळ ८४ मतांनी निसटता विजय झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवार गटाला मोठा धक्का, घनसावंगीतून राजेश टोपे पराभूत, शिंदेच्या उमेदवारचा अवघ्या २३०९ मतांनी विजय
Ghansawangi Assembly Constituency: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घनसावंगीत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे मोठे नेते राजेश टोपे यांच्या पराभव झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: काँग्रेसला धक्क्यावर धक्के..! पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात पराभूत, तर नाना पटोलेंचा केवळ २०८ मतांनी निसटता विजय
Balasaheb Thorat : काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यात बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते.
महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीच्या बंपर विजयाने अदानींची झाली चांदी, ३०० कोटी डॉलरची गुंतवणूक होती धोक्यात!
Maharashtra Assembly Election : मुंबईतील ६२० एकर जमिनीचे रूपांतर नागरी केंद्रात करण्याची अदानी ग्रुपची योजना आहे. ही जमीन न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कपेक्षा तीन चतुर्थांश आकाराची आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार! सांगलीने राखली लाज, पाहा २६ मतदारसंघांचा निकाल एका क्लिकवर
Maharashtra Assembly Election Result : कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातून महाआघाडी हद्पार झाली असून सांगली जिल्ह्याने थोडाफार हात दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तर सर्व दहाच्या दहा जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Nanded By Election Result: लोकसभेत गमावलेली नांदेडची जागाही भाजपने पोटनिवडणुकीत जिंकली, काँग्रेसला मोठा झटका
Nanded By Poll Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजप आघाडीने बाजी मारली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती.
महाराष्ट्र बातम्या News Live: Wayanad By Election Result: वायनाड पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी ४ लाखांहून अधिक मतांनी विजयी!
Wayanad By Election Result 2024: काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वायनाड पोटनिवडणुकीत ४ लाखांहून अधिक मतांनी जिंकून सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव! २१ मतदारसंघात कोण विजयी कोण पराभूत ? वाचा
Maharashtra Vidhansabha Election : पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघात महायुतीने निर्विवाद यश मिळवलं आहे. २१ पैकी १८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर अवघ्या देशाचे लक्ष असलेल्या बारामती येथून अजित पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra election: मुंब्रा- कळव्यातून जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी, नजीब मुल्ला यांचा १ लाख मतांनी पराभव
Karad South Constituency Result: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा- कळवा मतदारसंघातून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विजय मिळवला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: शिंदे सेनेचे ५७ आले पण ‘काय झाडी, काय डोंगार..’ फेम शहाजीबापू पाटलांचं काय झालं? वाचा सांगोल्याचा निकाल
Sangola Constituency : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra election results: कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
Karad South Constituency Result: काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव स्वीकारावा लागला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड राखला! मिलिंद देवरा अन् मनसेचे संदीप देशपांडे पराभूत
Worli Assembly Constituency :महायुतीच्या वादळात आदित्य ठाकरेंनी कसाबसा आपला गड शाबूत ठेवला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांचे पुत्र व शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बॅलेट पेपरने मतदान घ्या, पराभूत होताच संजय राऊत यांची मागणी! सोशल मीडियावर मीम्सचा पूर
Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील मतमोजणीदरम्यान संजय राऊत सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. महाविकास आघाडी पराभवाच्या उंबरठ्यावर असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Amit Thackeray : माहीममधून अमित ठाकरे यांचा पराभव; सदा सरवणकर यांना मात देत महेश सावंत यांनी मारली बाजी!
Maharashtra Election Mahim Seat: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार का? मुख्यमंत्रीपदाबाबत काय असणार भाजपचा प्लॅन
Maharashtra Election Result : जागांच्या बळावर भाजपाचा मुख्यमंत्री होणार की महाराष्ट्रात बिहार मॉडेल वापरले जाणार, असा प्रश्न पडू लागला आहे. बिहारमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार असले तरीही ज्यांच्या नेतृत्वात सरकार आले त्या नितीशकुमारांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यात आले होते.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra election results: मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव, अबू आझमी विजयी
Mankhurd Shivaji Nagar constituency Result: मानखुर्द- शिवाजीनगर मतदारसंघातून नवाब मलिक यांचा पराभव झाला असून अणुशक्तीनगर विधानसभा निवडणुकीत त्यांची कन्या सना मलिक यांचा विजय झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: लाडकी बहीण योजना नसती, तरी देवेंद्र जिंकला असता! आईने सांगितला फडणवीसांचा व्हिक्टरी फॉर्म्युला
Devendra Fadnavis mother reaction : देवेंद्र फडणवीस यांच्या आईनेही त्यांच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Kolhapur Election Result : कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक विजयी, ऋतुराज पाटलांचा पराभव; सतेज पाटील यांना मोठा झटका
Kolhapur South Assembly Election Result : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला निकाल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये लागला आहे.भाजपचे उमेदवार अमल महाडिक विजयी झाले असून ऋतुराज पाटील यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: भगवाधाऱ्यांचं राज्य, आता अल्लाहू अकबर नाही तर जय श्रीराम ऐकू येणार! नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Election Result 2024 Kankavli: कणकवलीत भाजपाचे उमेदवार नितेश राणे हे विजयी ठरताना दिसले आहेत, ज्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाची लाट पसरली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांचं काळजी वाढणार; तर अजित पवार टेन्शन फ्री! कारण काय?
Maharashtra Election Result 2024 : महाराष्ट्रात सध्या महायुती म्हणजेच भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट यांनी निवडणुकीच्या रीन्ग्नात्त बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: उद्धव ठाकरे सोबत आल्यास त्यांचं स्वागत, पण... काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
Chandrakant Patil on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या विषयी मोठं विधान केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्र निवडणूक निकालापूर्वी पोस्टर वॉर, पुण्यात झळकले अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर
Pune politics : मतमोजणीपूर्वी पुण्यात एका पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते संतोष नांगरे यांनी हे पोस्टर लावले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यातील २१ मतदारसंघाचे निकाल ४६५ फेऱ्यानंतर होणार स्पष्ट! एका फेरीला लागणार २० मिनिटं, २ वाजेपर्यंत लागणार निकाल
Maharashtra Vidhansabha nivadnuk : पुण्यातील २१ मतदार संघाची मतमोजणी ही आज होणार आहे. तब्बल ४६५ फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहे. यानंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण; तब्बल ५०६ टेबलावर होणार मतमोजणी
Maharashtra vidhan sabha Election: पुणे जिल्ह्यातील तब्बल २१ मतदारसंघासाठी तयारी पूर्ण झाली आहे. सुरवातीला टपाली मतदान मोजले जाणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठा बदल; पर्यायी मार्गाचा करा वापर
Pune Traffic Update : पुण्यात आज मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात वाहतुकीत देखील बदल करण्यात आले आहेत. कोणते पर्यायी मार्ग आहेत. ते जाणून घेऊयात.