मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 22, 2024: Mumbai: मुंबई लोकलमधून प्रवास करताना सीटवरून झाला वाद, दुसऱ्या दिवशी दिसताच केले सपासप वार!
Maharashtra Election News LIVE November 22, 2024: Mumbai: मुंबई लोकलमधून प्रवास करताना सीटवरून झाला वाद, दुसऱ्या दिवशी दिसताच केले सपासप वार!
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 22 Nov 202404:30 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai: मुंबई लोकलमधून प्रवास करताना सीटवरून झाला वाद, दुसऱ्या दिवशी दिसताच केले सपासप वार!
Minor Boy Kills Passenger In Mumbai: मुंबईतील घाटकोपर स्थानकावर एका अल्पवयीन मुलाने प्रवाशाची चाकू भोसकून हत्या केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, विधानसभेच्या निकालाआधीच पुण्यात झळकले अजित पवारांचे पोस्टर!
Maharashtra Elections Results 2024: महाराष्ट्रात कुणाची सत्ता स्थापन होणार, हे उद्या स्पष्ट होणार असून त्याआधीच पुण्यात अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकल्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : शरद पवारांनी सांगितला आमदारांचा आकडा! म्हणाले लोड घेऊ नका! मतमोजणी पूर्वी राज्यातील राजकारण तापलं
Maharashtra assembly election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची तातडीची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते. स
महाराष्ट्र बातम्या News Live: विधानसभा निवडणुकीचा उद्या निकाल! किती वाजता सुरू होणार मतमोजणी? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स
maharashtra assembly election counting : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी पार पडले असून उद्या शनिवारी मतमोजणी होणार आहे. या मोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: दगाफटका टाळण्यासाठी मविआ अलर्ट! काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमान सज्ज; निवडून आलेल्या आमदारांना राज्याबाहेर हलवणार
Maharashtra Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीचा उद्या शनिवारी निकाल लागणार आहे. दोन्ही आघाड्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते अलर्ट असून दगा फटका टाळण्यासाठी आमदारांना राज्याबाहेर हलवण्यासाठी स्पेशल व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबई महानगर पालिकेचा करबुड्यांना दणका! जप्तीची कारवाई सुरू; दहा जणांकडे तब्बल ६०० कोटी रुपये थकीत
bmc action against tax defaulters : मुंबई महानगर पालिकेने कर बुडव्यांवर कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता कराच्या बड्या थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली असून मालमत्ता जप्त केली जात आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यात मतदानाचा टक्का वाढला! एकूण ६६. ५ टक्के मतदानाची नोंद; वाढलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार ?
Maharashtra Assembly Elections : राज्यात या वर्षी मतदानाचा टक्का वाढला आहे. राज्यात एकूण ६६.५ टक्के मतदान झाले असून गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान ५ टक्यांनी वाढले आहे. हे वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार हे उद्या मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्य गारठले! तापमान १० अंशांवर; पुढच्या काही दिवसांत थंडी आणखी वाढणार, IMD चा अंदाज
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. थंडी वाढली आहे. आज राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसानंत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत, 'हयात' आणि 'मातोश्री'वर महत्वाची बैठक, पुढची रणनीती ठरली ?
Maharashtra Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. उद्या मतमोजणी होणार असून ९ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.