मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 19, 2024: महाराष्ट्रात आज ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क; ४१३६ उमेदवार; १ लाख मतदान केंद्र; मदतीसाठी १९५० हेल्पलाइन क्रमांक
Maharashtra Election News LIVE November 19, 2024: महाराष्ट्रात आज ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क; ४१३६ उमेदवार; १ लाख मतदान केंद्र; मदतीसाठी १९५० हेल्पलाइन क्रमांक
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 19 Nov 202405:00 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्रात आज ९.७ कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क; ४१३६ उमेदवार; १ लाख मतदान केंद्र; मदतीसाठी १९५० हेल्पलाइन क्रमांक
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत २८८ मतदारसंघातील सुमारे ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: मागून फेकलेला दगड समोरून लागतो, असे फक्त रजनीकांतच्या चित्रपटात घडतं; अनिल देशमुख प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on Anil Deshmukh Attack: माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Cash for votes: विवांता हॉटेलमध्ये एकूण किती रक्कम सापडली? पोलीस चौकशीत खरा आकडा समोर
Maharashtra Cash-For-Vote: विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी विनोद तावडे यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बीव्हीएचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला.
Sushma Andhare on Devendra Fadnavis: भाजप नेते विनोद तावडे यांच्या पैसे वाटल्याचा आरोप झाल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: नेमकं चाललंय काय? पैसे वाटपाच्या राड्यानंतर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून निघून गेले!
Maharashtra Assembly Election : पैसे वाटपावरून चार तास आमनेसामने आलेले विनोद तावडे व हितेंद्र ठाकूर शेवटी एकाच गाडीतून निघून गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: भाजपच्या बड्या नेत्यांनीच तावडेंची माहिती दिली! पैसे वाटप प्रकरणावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut Reaction On Vinod Tawde case : भाजप नेते विनोद तावडे पैसे वाटत असल्याची माहिती त्यांच्याच पक्षाच्या बड्या नेत्यांनी दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मला माफ करा, जाऊ द्या… पैसे वाटताना पकडल्यावर विनोद तावडे यांनी विनवणी केल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा
Vinod Tawde : विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेल्यावर विनोद तावडे हे माफी मागत होते. सुटकेसाठी गयावया करत होते, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! विरारमध्ये भाजप व बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तूफान राडा! विनोद तावडेंनी ५ कोटी रुपये वाटल्याचा आरोप
Vinod Tawde in Virar: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. मात्र, त्यामुळे राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोप करत बहुजन विकास आघाडी व भाजपच्या कार्यकर्त्यांत राडा झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात ड्रिंक अँड ड्राइव्ह! दारू पिऊन भरधाव वेगात गाडी चालवून अल्पवयीन मुलाने तीन वाहनांना उडवले, रिक्षाचालक ठार
Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर रात्री भीषण अपघात झाला. दारू पिऊन कार चालवून अल्पवयीन मुलाने तीन गाड्यांना उडवले. यात एकाच मृत्यू झाला आहे. झालेल्या भीषण अपघातात अल्पवयीन मुलाने तीन वाहने उडवून दिली. अपघाताच्या वेळी अल्पवयीन मुलगी मद्यधुंद अवस्थेत होती, असा आरोप आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: युगेंद्र पवारांचे वडिल श्रीनिवास पवारांच्या शोरुममध्ये पोलिसांची मध्यरात्री मोठी शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
Baramati News : राज्यात बारामती मतदार संघाकडे सर्व राज्याचे लक्ष लागून आहे. या मतदार संघात काका पुतण्या अशी लढत होत आहे. दरम्यान, प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टस्टाईलपुढे अडवल्याची घटना ताजी असतांना आता युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या कार शोरूमची पोलिसांनी तपासणी केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: संभाजीनगरात मतदान कार्ड घेऊन बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटले! ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप
Ambadas Danve allegations about Sambhaji nagar : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. मात्र, त्यापूर्वी संभाजी नगरात मोठ्या प्रमाणात पैसे वाटून नागरिकांच्या बोटाला शाई लावण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: रस्ता नसल्यानं पाच महिन्यांच्या गर्भवतिला झोळीतून दवाखान्यात नेलं, पण....; नंदुरबारच्या अक्कलकुवा येथील घटना
Nandurbar News: राज्यात एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात रस्ता नसल्याने एका गर्भवती महिलेला वेळेत दवाखान्यात नेता न आल्यानं तिचा गर्भपात झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना २ डिसेंबर रोजी पुण्याच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
Rahul Gandhi Veer Savarkar Defamation Case : राहुल गांधी यांना २ डिसेंबर रोजी पुण्यातील न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल बदनामी कारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांना हे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या हल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'ही घटना...'
Sharad Pawar on Anil Deshmukh Attack : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी भ्याड हल्ला झाला. या हल्ल्यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले. देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जेष्ठ नेते शरद पवार यांनी निषेध केला आहे.