मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 18, 2024: Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल
Maharashtra Election News LIVE November 18, 2024: Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 18 Nov 202404:25 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल
Anil Deshmukh Injured: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीत ते गंभीर जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: विधानसभेच्या मतदानाला एक दिवस उरला असताना एकनाथ खडसे यांची मोठी घोषणा
भाजपचे माजी नेते एकनाथराव खडसे यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपली कन्या रोहिणी यांना पाठिंबा देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवारांचं बारामतीकरांना आवाहन; ‘अजित पवारांना तीनदा उपमुख्यमंत्री केलं. आता युगेंद्र पवारांना निवडून द्या’
अजित पवार यांना मी एकदा नाही तीनदा उपमुख्यमंत्री केलं. आता बारामतीत नवीन पिढीला संधी देण्याची गरज असून युगेंद्र पवार यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन शरद पवार यांनी बारामतीतील मतदारांना केलं.
महाराष्ट्र बातम्या News Live: 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील झळकलेल्या बॅनरची राज्यभर चर्चा
Sharad Pawar : शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हातातील बॅनरनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं. 'जिकडं म्हातारं फिरतंय तिकडं चांगभलं हुतंय...' असं त्या बॅनरवर लिहिल्याचं दिसून आलं.
Sanjana Jadhav Viral Video: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सभेत बोलताना रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना अश्रू अनावर झाले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
महाराष्ट्र बातम्या News Live: Raj Thackeray : ‘शिवसेनेतील भांडखोर सासूमध्ये प्रॉब्लेम’; शिवडीतील सभेतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Raj Thackeray On Uddhav Thackeray : २०१९ पासून महाराष्ट्रात जे काही घडलं त्याला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना भांडखोर सासूची उपमा देत ज्यांनी तुमच्या मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही अद्दल घडवली पाहिजे, असं आवाहन मतदारांना केलं.
महाराष्ट्र बातम्या News Live: Jalgaon news : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jalgaon news : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी येत आहे. एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष व अपक्ष उमेदवार उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम यांच्या घरावर काही अज्ञात व्यक्तिने गोळीबार केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: भर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आणली तिजोरी; तिजोरीत नेमकं होतं काय?
Rahul gandhi on Ek hai to safe hai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेचा अर्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सांगितला.
महाराष्ट्र बातम्या News Live: मध्य बैरूतवर इस्रायलचा भीषण हल्ला! हिजबुल्लाहचा प्रवक्ता ठार; लेबनॉनमध्ये प्रचंड दहशत
Israel attacks central Beirut : इस्रायलने रविवारी मध्य बैरूतमध्ये केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रवक्त्याचा मृत्यू झाला. याशिवाय पाच जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: डोक्यावर दुपट्टा घेऊन स्वरा भास्कर पोहोचली मौलाना सज्जाद नोमानी यांच्या भेटीला, सोशल मीडियातून टीकेची झोड
Swara Bhasker meets maulana sajjad nomani : महाविकास आघाडीकडून निवडणूक लढणाऱ्या पतीसोबत स्वरा भास्कर हिनं मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतल्यानं ती वादात अडकली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला! धारदार शस्त्रांनी सात ते आठ जणांनी केले वार
Kolhapur Santaji Ghorpade attack: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले असतांना कोल्हापुरात करवीर विधानसभा मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर काही जणांनी जीवघेणा हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: राज्यात तापमानात मोठी घट! थंडी कधी पडणार ? IMD ने दिली महत्वाची अपडेट
Maharashtra Weather News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ उतार पाहायला मिळत आहे. कधी पाऊस, कधी उष्णता तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण नागरिक अनुभवत आहेत. त्यामुळे त्यामुळे कडक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! आता वेध मतदानाचे; शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याची उमेदवारांची धडपड
Maharashtra Vidhan sabha election 2024 : तब्बल महिनाभरापासून शिगेला पोहोचलेल्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. संध्याकाळी प्रचाराचा तोफा थंडावणार असून आता उमेदवारांसह मतदारांना मतदानाच्या दिवसाची प्रतीक्षा आहे.