मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 14, 2024: Narendra Modi : "...तर तुम्हाला रुग्णालयात जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Election News LIVE November 14, 2024: Narendra Modi : "...तर तुम्हाला रुग्णालयात जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 14 Nov 202405:12 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Narendra Modi : "...तर तुम्हाला रुग्णालयात जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
PM Modi Mumbai Rally : तुम्ही राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट वदवून घ्या, तुम्हाला चांगली झोप येईल व रुग्णालयात जायची गरज राहणार नाही, असा टोला पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना लगावला.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : कुणी मूर्खासारखे काही बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची?; शरद पवारांचा राज ठाकरेंवर खोचक पलटवार
Sarad pawar On raj thackeray : राज ठाकरे नावाचे गृहस्थ जे काही बोलत आहेत त्याला आधार काय आहे मला माहिती नाही. काहीही ठोकून द्यायचे. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना वाटते की काहीतरी असावे बाबा. त्यामुळेच आरोप करत असावेत, असा पलटवार शरद पवार यांनी केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: Uddhav Thackeray : मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातून हल्लाबोल
Uddhav Thackeray On mahadik : ठाकरे म्हणाले की, धमकी देतोस की काय? मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक यांना इशारा दिला.
महाराष्ट्र बातम्या News Live: १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसूल करणार, कोल्हापुरात भाजपच्या महिला नेत्याचं वक्तव्य, VIDEO
Kolhapur Politics : १५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसूल करणार, अस वक्तव्यं भाजपच्या पदाधिकारी मेघाराजी जाधव यांनी केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Jalgaon ambulance explodes: जळगावच्या दादावाडीजवळील राष्ट्रीय महामार्गावर गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना उघडकीस आली.