मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live November 10, 2024: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक; नेपाळला जाणार होता पळून
Maharashtra Election News LIVE November 10, 2024: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक; नेपाळला जाणार होता पळून
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 10 Nov 202405:09 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक; नेपाळला जाणार होता पळून
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफ आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने बहराइच जिल्ह्यातील नानपाडा येथून कथित मुख्य शूटर आणि इतर चार आरोपींना अटक केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: गुवाहाटीचे डोंगर पाहिले, आता त्यांना २३ तारखेला टकमक टोक दाखवायचं, सांगोल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Uddhav Thackeray sangola Rally : गेल्यावेळी आपण एका गद्दाराला उमेदवारी दिली. तुम्ही सर्वांनी त्याला संधी दिली. पण त्यानं संधीचं सोनं नाही तर आयुष्याचं मातेरं केलं, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यात केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Amit Shah : मुंबईत अमित शहांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, जाहीरनामा प्रसिद्ध करताना एक तरुण उठला अन्..
Amit Shah Bjp Manifesto :अमित शहा यांची पत्रकार परिषद सुरु असताना पत्रकारांमध्ये उपस्थित असलेला एक व्यक्त उभा राहिला व त्याने वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढते दर आणि बेरोजगारीवरुन विरोध केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : हे सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही, शरद पवारांची जोरदार फटकेबाजी
Sharad Pawar : परांडामध्ये शरद पवारांनी स्वत: त्यांच्या वयाचा उल्लेख करत महायुतीला मोठा इशारा दिला. सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होत नाही, अशी जोरदार बॅटींग शरद पवारांनी केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचं ‘ते’ वक्तव्य भोवलं, निवडणूक आयोगानं दिला दणका
Dhananjay Mahadik : लाडकी बहीण योजनेबाबत अक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणात धनंजय महाडिक अडचणीत आले आहेत. आता निवडणूक आयोगानेही त्यांच्या वक्तव्याची दखल घेत त्यांना नोटीस पाठवली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Elections : कुठं पती-पत्नी तर कुठं काका पुतण्यात सामना; महाराष्ट्रातील ‘या’ जागांवर नातेवाईकच रिंगणात
Maharashtra Assembly Election : २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांवर घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काही जागांवर भावा-भावात, नातेवाईकांत तर वडील व मुलांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मतं मिळवण्यासाठी 'दादा'गिरी? युनिट चालवायचं का नाय..., अजित पवारांचा कारखान्यातला VIDEO आव्हाडांकडून शेअर
Ajit Pawar Video : एका कारखान्यात बोलताना अजित पवार दादागिरी करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करताना केला आहे. हा व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याचा दावाही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: स्वस्त सिलेंडरसह महिलांना देणार ३००० रुपये, जातीय जनगणेचे आश्वासन! महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध
mahavikas aghadi manifesto : महाविकास आघाडीने देखील आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अमित शहा यांनी स्पष्टचं सांगितलं; उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावरही केलं भाष्य
Amit Shah on Uddhav Thackeray And Sharad Pawar : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने संकल्पपत्र हा जाहीरनामा सादर केला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्र बातम्या News Live: जय शहा याने महाराष्ट्रातल्या खेड्यातल्या एखाद्या तरुणासोबत क्रिकेट खेळून दाखवावं: उद्धव ठाकरे यांचं आव्हान
ठाकरे घराण्याच्या घराणेशाहीवर टिका करणाऱ्या अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टिका केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा याचे कर्तृत्व काय? त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या गावातला तरुण जास्त चांगला क्रिकेट खेळतो, असं ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र बातम्या News Live: भाजपच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस! पाच वर्षात काय काय करणार ? जाणून घ्या घोषणांची यादी
BJP election manifesto 2024 : भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. या जाहीरनाम्यात विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: भाजपचे पीक वाढले आहे, मात्र किडही लागली आहे, फवारणी करावी लागेल; नितीन गडकरी यांच मोठं विधान
Nitin Gadkari on BJP : नितीन गडकरी यांनी भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवर भाष्य केलं आहे. सरकार आणि प्रशासन धर्मनिरपेक्ष असणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र बातम्या News Live: संभाजीनगर येथील फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला भीषण आग! तिघांचा जळून मृत्यू, दोघे जखमी
Sambhajinagar Fire : संभाजी नगर येथील फुलंब्री येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्लॅस्टिकचे सामान विक्रीच्या दुकानात आग लागली असून या आगीत तिघे जण ठार झाले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बाबा सिद्दिकींचा हत्येचा प्लॅन फेल झाला असता रेडी होता बिष्णोई गँगचा 'प्लान बी'; टार्गेटवर होता पुण्याचा बडा नेता!
lawrence bishnoi gang plan b revealed : मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लॅन फासला असला तर पुण्यात एका नेत्याची हत्या करण्यात येणार होती. ही माहिती मिळाल्यावर याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा जोर वाढला! कपाटात ठेवलेले गरम कपडे काढा; नाशिक अन् मराठवाड्यात थंडीचा वाढली
Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात तापमानात मोठी घट झाली आहे. या सोबतच मराठवाडा आणि विदर्भात देखील तापमानात घट झाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवारांच्या उमेदवाराच्या मुलाचं अपहरण, महिलेसमोर विवस्त्र करून बेदम मारहाण! राजकारणात खळबळ
Shirur Assembly constituency : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.