मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 6, 2025: लाडकी बहीण ठरतेय राज्याच्या तिजोरीवर भार..! शेतकरी योजनांसाठी निधीची कमतरता, कृषिमंत्र्यांनी कबूलच करून टाकलं
Maharashtra Election News LIVE January 6, 2025: लाडकी बहीण ठरतेय राज्याच्या तिजोरीवर भार..! शेतकरी योजनांसाठी निधीची कमतरता, कृषिमंत्र्यांनी कबूलच करून टाकलं
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 06 Jan 202506:21 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: लाडकी बहीण ठरतेय राज्याच्या तिजोरीवर भार..! शेतकरी योजनांसाठी निधीची कमतरता, कृषिमंत्र्यांनी कबूलच करून टाकलं
एकनाथ शिंदे सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू केलेल्या या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. मात्र ही योजना राज्याच्या तिजोरीवर भार ठरत असल्याचे मंत्री म्हणत आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Manmad Accident : मनमाडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकने २ शाळकरी मुलांना चिरडले, एका मुलाचा व मुलीचा जागीच मृत्यू
Manmad Accident : भरधाव ट्रकखाली सापडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही दहावीच्या वर्गात शिकत होते. दोघांच्या अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ऑनर किलिंग..! घर सोडून गेलेल्या बहिणीला भावानेच २०० फूट खोल दरीत ढकलून संपवलं, छत्रपती संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhajinagr : घर सोडून गेलेली बहीण काही दिवसानंतर घरी परत आली. त्यानंतर चुलत भावाने तिला डोंगरावर नेलं व खाली ढकलून दिलं. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ‘महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत, मोफत जेवण बंद करा’, साई भक्तांबाबत बोलताना माजी खासदाराची जीभ घसरली
Sujay Vikhe On Sai Baba Sansthan : शिर्डीत भिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. मोफत जेवण बंद करावं आणि मुलांच्या भविष्यासाठी हा पैसा खर्च केला जावा, असे सुजय विखे म्हणाले.
महाराष्ट्र बातम्या News Live: Law Of India: आर्थिक हिंसाचार, शारीरिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचार यांच्यात नेमका फरक काय? वाचा
Explainer: महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने कौटुंबिक हिंसाचार कायदा संमत केला आहे. दरम्यान, र्थिक हिंसाचार, शारीरिक हिंसाचार आणि लैंगिक हिंसाचार यांच्यातील फरक जाणून घेऊयात.
Mumbai Scam : आर्टिफिशल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस कंपनीने लोकांना आठवड्याला १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Eknath Shinde : खुलेआम बारूद से उडा दूंगा! एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
Eknath Shinde Death Threat: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या २६ वर्षीय तरुणाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: HMPV मुळे टेन्शन वाढलं; महाराष्ट्र सरकारकडून ॲडव्हायझरी जारी, वाचा काय करावे व काय करू नये?
HMPV Advisory : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एचएमपीव्हीचा संसर्ग भारतासह अनेक देशांमध्ये आधीच पसरत आहे आणि विविध देशांमध्ये त्याच्याशी संबंधित श्वसनाच्या आजारांची प्रकरणे समोर आली आहेत.आता महाराष्ट्र सरकारनेही ॲडव्हायझरी जारी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: रेल्वेची माणुसकी! धावत्या रेल्वेतून पडलेल्या प्रवाशाच्या मदतीसाठी तब्बल १ किमी उलटी धावली ट्रेन
Indian Railway News : रेल्वेतून एक प्रवासी खाली पडल्याने त्याच्या मदतीसाठी तब्बल १ किमीपर्यंत रेल्वे उलटी धावल्याची घटना शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.
महाराष्ट्र बातम्या News Live: H5N1 Bird Flu: नागपुरात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू, अलर्ट जारी
Bird flu kills 3 Tigers And Leopard at Nagpur: नागपुरात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला असून व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्रांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात कुत्राच्या भुंकण्यामुळे होतेय ध्वनि प्रदूषण! नागरिकांचा तक्रारींचा पाढा, कारवाई बाबत अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
Pune News : महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कुत्र्यांच्या आवाजामुळे ध्वनि प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही नागरिकांनी मंडळाला या बाबत ई-मेल लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण, या बाबत मार्गदर्शक तत्व नसल्याने कारवाई काय करावी या बाबत संभ्रम आहे.