मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 24, 2025: भाजप सरकारला महाराष्ट्रात दारूचा प्रचार करायचा आहे का? काँग्रेसचा दावोस करारांवरून फडणवीसांना सवाल
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 24 Jan 202505:51 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: भाजप सरकारला महाराष्ट्रात दारूचा प्रचार करायचा आहे का? काँग्रेसचा दावोस करारांवरून फडणवीसांना सवाल
Davos Economic Forum 2025 : महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचे स्वागत आहे, पण या करारांचे बारकावे आणि त्यामागचे वास्तव जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे, त्यामुळे दावोसमध्ये कोणाशी काय करार झाले, याची सरकारने श्वेतपत्रिका जारी करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Pune Accident : हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन आयटी इंजिनिअर तरुणींचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरारक Video समोर
Pune Accident : हिंजवडी - माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे रेडिमीक्सने भरलेला डंपर रस्त्यातच पलटी झाला. त्याखाली चिरडून दुचाकीवर स्वार दोन इंजिनिअर तरुणी जागीच ठार झाल्या.
महाराष्ट्र बातम्या News Live: Cm Relief Fund : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’
Chief Minister Assistance Fund :मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात सादर झालेल्या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असतात. या निर्णयामुळे नागरिकांना या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: घरात सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या मुंबईकर नागरिकाला सरकारकडून दिल्लीतील ‘रिपब्लिक डे परेड’चं आमंत्रण!
मुंबईत आपल्या घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून घरात संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारे विकास पंडित यांना केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाचे संचलन पाहण्यासाठीचे आमंत्रण आले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ST Bus Fare Hike : एसटी बसचा प्रवास महागणार, १५ टक्के भाडेवाढीला महामंडळाची मंजुरी
ST Bus Fare Hike : महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने 25 जानेवारीपासून एमएसआरटीसी बस भाड्यात 14.95 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात ट्रूथ अँड डेअर गेमच्या माध्यमातून १७ वर्षीय तरुणीवर तिघांचा बलात्कार! इन्स्टाग्राम मैत्रिणीमुळे झाला घात
Rape case in Pimpri Chinchwad: मुंबईच्या वसई येथे एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतांना आता पिंपरी चिंचवडच्या रावेत परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी दारू पिऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Thane Accident : ठाण्यात हिट अँड रनच्या घटनेने घेतला समाज सेविकेचा जीव, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा मृत्यू
Thane Accident : ठाण्यात एका अपघातात सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा मृत्यू झाला. त्या सकाळी फिरायला जात असतांना त्यांना एका वाहनाने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: भंडाऱ्या जवळ जवाहरनगर येथील ऑर्डंनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट! ५ कामगार ठार, बचावकार्य सुरू
Bhandara ordinance factory Blast : भंडाऱ्या जवळील जवाहरनगर येथील आयुध निर्माणी कारखान्यात सकाळी ११ वाजता भीषण स्फोट झाला आहे. यात ५ कामगार ठार झाले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं! पुण्यातील कार्यक्रमातील प्रकार, खुर्ची केली दूर
Sharad pawar and Ajit Pawar : पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार दोघेही एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांजवळ बसणे टाळल्याचे दिसले.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात थंडी परतणार ? IMD ने दिला महत्वाचा इशारा, पुण्यासह राज्यात हवामानात मोठे बदल
Maharashtra Weather Update : मध्य प्रदेशासह केरळच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. त्यामुळं चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असून उत्तरेकडून सातत्यानं शीतलहरींचा सुरु असणारा मारा व पश्चिमी झंझावातामुळं राज्यातील तापमानात लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: 'लाऊडस्पीकर हा कोणत्याही धर्माचा अविभाज्य भाग नाही; मुंबई हाय कोर्टाचे मशिदीवरील भोंग्यांवर कारवाईचे आदेश!
Bombay High Court on loudspeaker : मुंबई उच्च न्यायालयानं मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने म्हटलं की, लाऊडस्पीकरचा वापर हा कोणत्याही धर्माचा अत्यावश्यक भाग नाही.