मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 19, 2025: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 19 Jan 202507:56 AM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना! दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू
Goa Paragliding Accident : गोव्यात पॅराग्लायडिंग करतांना दरीत कोसळल्याने पुण्यातील पर्यटक तरुणीचा व पॅराग्लायडरचा दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर रायजादा यांच्याविरोधात मांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होताच रायगडमध्ये तुफान राडा! भरत गोगवले समर्थकांनी टायर जाळून मुंबई-गोवा हायवे रोखला
Raigad Guardian Minister Issue: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची निवड केल्याने शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी रात्री मुंबई-गोवा महामार्ग रोखला.
महाराष्ट्र बातम्या News Live: Bird Flu in Maharashtra: उदगीरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव! शासनाने केली अलर्ट झोनची घोषणा
Bird Flu in Maharashtra: लातूरमधील उदगीर तालुक्यात अचानक कावळे व काही पक्षी मरून पाडल्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पोलिस भरतीचं स्वप्न भंगलं! भरधाव एसटीने भरतीची तयारी करणाऱ्या ३ तरुणांना चिरडलं; बीड-परळी महामार्गावरील घटना
Beed Accident : बीड पळळी मार्गावर भीषण अपघात झाला आहे. पोलिस भरतीची तयारी करत असतांना तीन तरुणांना भरधाव एसटीने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: विजय दास कसा सापडला तावडीत! एक कॉल ठरला महत्वाचा; कांदळवनाच्या जंगलातून अटकेचा पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Saif Ali Khan Case Update : सेफ अली खानच्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोर हा कांदळवनाच्या जंगलात लपून बसला होता. त्याच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या तावडीत सापडला.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुणे हादरले! सावकाराच्या जाच्याला कंटाळून १० वर्षांच्या मुलाची केली हत्या, नंतर पत्नी पत्नीने घेतला गळफास, पती बचावला
Pune Pimpri Chinchwad Crime News: पुण्यात सावकारी जाच्याला कंटाळून एकाने आपल्या मुलाला ठार मारले. त्यानंतर पत्नीसह गळफास घेतला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारठा अन् दुपारी उकाडा! 'या' आठवड्यात कसे असेल हवामान ? IMD चा अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडी आणि उष्णता असा दोन्हींचा अनुभव नागरिक घेत आहेत. पुढील काही दिवस राज्यात थंडी, उकाडा आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जलसंपदाच्या अटी पाळल्याशिवाय मिळणार नाही अतिरिक्त पाणी
Pune water issue : पुण्यात अतिरिक्त पाणी देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्टीच्या पूर्ततेशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देता येणार नाही, अशी भूमिका जलसंपदा मंत्र्यांनी घेतली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! सैफ अली खानच्या हल्लेखोच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; ठाण्यातून केली अटक
Saif Ali Khan attacker arrested : अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली आहे. या व्यक्तीने हल्ल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मजूर छावणीतून आरोपीला अटक केली.