Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 16 Jan 202502:55 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूशखबर, जानेवारीचा हफ्ता कधीपर्यंत जमा होणार? सरकारनं थेट तारीखच सांगितली
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर आहे. २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले मुंबई असुरक्षित नाही..!
सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास एका घुसखोराने चाकूहल्ला केल्यानंतर त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुंबई हे देशातील सर्वात सुरक्षित मेगा सिटी आहे. ही घटना गंभीर असली तरी शहराला असुरक्षित ठरवणे चुकीचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी महाआघाडीच्या नेत्यांच्या ठणकावले.
महाराष्ट्र बातम्या News Live: सैफ अली खानवरील हल्ल्यामागे धार्मिक कट्टरतावादी; बड्या नेत्यानं व्यक्त केला संशय
Jitendra Awhad On Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यामागे धार्मिक कट्टरतावादी असू शकतात, असा संशय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी
सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी वांद्रे येथील सद्गुरु शरण अपार्टमेंटला भेट दिली. त्यात दया नायक हेही होते. कोण आहेत हे दया नायक?
महाराष्ट्र बातम्या News Live: सैफ अली खानच्या घरातच लपला होता हल्लेखोर? पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसलं ? वाचा
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या एका चोरट्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासले असून यात नेमकं त्यांना काय आढळलं याची चर्चा सध्या सुरू आहे. चोर आधीच घरात लपून बसला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात ढगाळ हवामान! काही ठिकाणी पावसाची शक्यता, IMD ने दिला इशारा
Maharashtra IMD Weather Update : राज्यात हवामानात मोठा बदल झाला आहे. बहुतांश जिल्ह्यात ढगाळ हवामान असून काही ठिकाणी हलका पाऊस देखील झाला. आज देखील ढगाळ हवामान कायम राहणार असून काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या वांद्रे पश्चिमेकडील घरात चोरी! अभिनेता सैफ अली खानवर चोरट्याचा चाकूने हल्ला
Saif Ali khan stabbed by the intruder : करिना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरात चोरी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान एका चोरट्याने सैफवर हल्ला केला, ज्यामुळे अभिनेता जखमी झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: वाल्मीक कराडला पिंपरी-चिंचवड पालिकेचा दणका! वाकडमधील अलिशाल फ्लॅट करणार सील; 'हे' आहे कारण
PCMC sealed flat of valmik karad in Wakad : पिंपरी-चिंचवड पालिकेने वाल्मीक कराडला मोठा दणका दिला आहे. वाकड येथील फ्लॅट पालिकेने सील केला आहे. पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ६०१ क्रमांकाचा वाल्मीक कराड व त्याची पत्नी मंजली कराडयांचा हा फ्लॅट आहे.