मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live January 11, 2025: Ravindra Chavan : भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड, काय आहे समीकरण?
Maharashtra Election News LIVE January 11, 2025: Ravindra Chavan : भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड, काय आहे समीकरण?
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sat, 11 Jan 202506:17 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Ravindra Chavan : भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड, काय आहे समीकरण?
Ravindra chavan : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत पत्र काढून चव्हाण यांची निवड केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बस सुरु ठेवून चालक खाली उतरला अन् अचानक बेस्ट बसने स्पीड पकडला..! दोघांना उडवले, विक्रोळीतील विचित्र घटना
Vikhroli Bus Accedent : बेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झाली. या विनाचालक धावणाऱ्या भरधाव बसने दोन जणांना उडवलं व टी स्टॉलवर जाऊन आदळली.
महाराष्ट्र बातम्या News Live: बीडच्या ‘आका’वरून रणकंदन माजवणाऱ्या सुरेश धसांचाच 'आका' सुषमा अंधारेंनी काढला; नेमकं काय म्हणाल्या...
Sushma Andhare : सुषमा अंधारे यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, धस साहेब आपला लढा यशस्वी व्हावा हीच महाराष्ट्राची सदिच्छा आहे. पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!
महाराष्ट्र बातम्या News Live: निमंत्रणाच्या वादानंतर बारामतीत अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच मंचावर, भेटीत नेमकं काय घडलं?
Baramati Politics : बारामतीच्या अंजनगावात केवी उपकेंद्र आणि राजे उमाजी नाईक यांच्या नावाने बनविलेल्या सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती.
महाराष्ट्र बातम्या News Live: Manoj Jarange Patil : तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंना इशारा
Manoj Jarange Patil : तुझ्या गुंडांना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर २५ जानेवारीनंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Nagpur : प्रेम विवाहाचा करुण अंत, चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या करून अपघाताचा रचला बनाव
Nagpur Crime : ा्हा वर्षापूर्वी त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून एकमेकांशी विवाह केला होता. दोघांचा सुखाने संसार सुरू होता, मात्र पतीच्या मनात पत्नीच्या चारित्र्यावरून संशयाचे भूत शिरले आणि सुखी संसाराचा सत्यानाश झाला.
महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवार अतिशय चाणाक्ष नेते; राजकारणात काहीही शक्य, RSS च्या कौतुकावर फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केलेले कौतुक हे धोरणात्मक पाऊल ठरू शकते, त्यामुळे ते संघाचा प्रभाव मान्य करत असावेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS चं तोंडभरून कौतुक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sharad Pawar On RSS : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि स्वयंसेवकांचं कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय बैठकीत मार्गदर्शन करताना पवारांनी आरएसएसच्या कामाचं कौतुक केलं.
महाराष्ट्र बातम्या News Live: ठाणे कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या केकला खवय्यांची चांगली पसंती, विक्रीतून लाखो कमावले!
Thane Jail Cake Sell: ठाण्यातील ठाणे कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या केकला खवय्यांची चांगली पसंती दाखवली आहे. या केकच्या विक्रीतून कारागृहाने लाखो रुपयांची कमाई केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Torres Scam : टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक खुलासा, अवघ्या ३०० रुपयांचे खडे डायमंड म्हणून ५०हजारांना विकले
Mumbai Torres Jewellery Scam: टोरेस घोटाळा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोरेसने डायमंडच्या नावाखाली मोइसॅनाइटच्या खड्यांची विक्री करून आपल्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली.