मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live February 7, 2025: Operation Tiger : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Maharashtra Election 2024 News LIVE: Operation Tiger : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Maharashtra Election News LIVE February 7, 2025: Operation Tiger : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Updated Feb 07, 2025 10:36 PM IST
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Fri, 07 Feb 202505:06 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Operation Tiger : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटणार असल्याचा दावा; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Uddhav Thackeray On operation tiger : पोलीस बाजूला ठेवा आणि मर्दाची अवलाद असाल तर माझा एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय अशी भीती दाखवायची पैशाचे अमिष दाखवायचं, ही कसली अवलाद, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरवर दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ajit Pawar : ‘मुलाला निवडून आणता आलं नाही अन्…’, अजित पवारांकडून राज ठाकरेंच्या वर्मावर बोट
Ajit Pawar On Raj Thackeray : तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता. लोकसभेत आम्हाला एक जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही, आम्ही मेहनत केली, असा टोला अजित पवारांनी राज ठाकरेंना लगावला
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana : अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेण्यासाठी 'हेड' तयार, हिंगोलीत लाडक्या भावांनीच लाटले पैसे
Ladki Bahin Yojana : अपात्र असतानाही लाभ घेतल्याने कारवाई होऊ शकते, या भीतीने अनेक महिला पैसे परत करण्यासाठी पुढे आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर योजनेतून नाव मागे घेण्यासाठी तसेच आधी घेतलेले लाभ पैसे परत करण्यासाठी रांगा लागल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील ५ लाख महिला अपात्र, काय निकष लावले? विरोधक म्हणतात ३० लाख महिलांना..
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेतून एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत. सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे अदिती तटकरे यांनी म्हटले गेले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: धक्कादायक! पुण्यातील PSI ने उचललं टोकाचं पाऊल; लोणावळ्यात आढळली कार, कारमध्ये डायरी, पोलीस दलात खळबळ
Pune Police : लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर पोलीस उपनिरीक्षकाने एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. जवळच त्यांची गाडी सुद्धा आढळलेली असून त्या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांनी आत्महत्येचं कारण नमूद केलेलं असू शकतं.
महाराष्ट्र बातम्या News Live: 'महाराष्ट्राच्या निवडणुकीत गडबड-घोटाळा…' राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर…
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा थेट आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. या आरोपांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: धनंजय मुंडेंसमोरच वाल्मीक कराडने मला चुकीचा स्पर्श केला, मारहाण केली..."; करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप
Karuna Sharma On walmik Karad : धनंजय मुंडे यांच्याशी वाद वाढल्यानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिकने आपल्याला मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात दहावी, बारावी परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पाण्याची बॉटल नेन्यास परवानगी, जीबीएसमुळे राज्य मंडळाचा निर्णय
HSC And SSC exam : पुण्यात पुढील आठवड्यात राज्य महामंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या परीक्षेत मुलांना वर्गात पाणी बॉटल नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात जीबीएसने घेतला आणखी एकाचा बळी! आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या पोहोचली १७३ वर
Guillain Barre Syndrome: पुण्यात जीबीएस बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. पुण्यात आणखी एका जीबीएस बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या रुगाला ताप, जुलाब, अशक्तपणा आणि चालता येत नसल्याने २८ जानेवारी २०२५ रोजी काशीबाई नवले रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र बातम्या News Live: ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरेंची साथ सोडणार ६ खासदार? शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता
Maharashtra Politics : राज्यात पुन्हा राजकीय घडामोडी घडणार आहेत. उद्धव ठाकरे गटाचे नऊपैकी सहा खासदार ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनापूर्वी ही मोहीम पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.