मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live February 3, 2025: Marathi Language : आता सरकारी, निमसरकारी कार्यालयात मराठीतच बोलायचं, सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 03 Feb 202505:55 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Marathi Language : आता सरकारी, निमसरकारी कार्यालयात मराठीतच बोलायचं, सरकारचा मोठा निर्णय
Marathi Language Mandatory : राज्य सरकारने मराठी भाषा धोरणाच्या अंमलबजावणीबाबत परिपत्रक काढले असून त्यानुसार सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठीतून बोलणे अनिर्वाय केले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; 'त्या' प्रकरणाच्या चौकशीसाठी अजित पवारांनी नेमली समिती
Dhananjay Munde News : ७३ कोटींच्या घोटाळ्याबाबत धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Nagpur Crime : टी शर्ट बनला मृत्यूचं कारण; नागपुरात ३०० रुपयांसाठी दोन भावांनी तरुणाचा गळा चिरला
Nagpur Crime : नागपूरमध्ये दोन तरुणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केली. ३०० रुपये किमतीच्या टी-शर्टवरून वाद सुरू झाला, त्यानंतर तरुणांनी मित्राची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला झटका..! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानाचा करावा लागणार खुलासा
Mumbai High Court : मुंबई उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आली असून मतदानाच्य़ा दिवशी शेवटच्या काही तासात वाढलेल्या मतांच्या टक्क्याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुलीला लग्नाची मागणी घालायला आलेल्या तरुणाची लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत हत्या, पुण्यातील भयंकर प्रकार
Pune Crime : लग्नाची मागणी घातली म्हणून संतापलेल्या मुलीच्या बापाने व नातेवाईकांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा जीव घेतल्याची घटना पुण्यात समोर आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ‘मी मध्यरात्री त्यांना भेटलो..’ धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या भेटीबाबत जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटण्यासाठी आले होते, असा दावा जरांगे यांनी केला आहे. मला मराठ्यांनी मोठं केलंय, मला सांभाळा असं मुंडे म्हणाल्याचंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पत्नीला चहातून झोपेच्या गोळ्या देऊन शेजऱ्यांशी ठेवले शारीरिक संबंध! मग गळा आवळून केली हत्या
Bareilly Murder : बरेलीत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेले पतीला चहातून झोपेचे औषध देऊन शेजाऱ्या सोबत शरीर संबंध ठेवले. यानंतर त्याची गळा आवळून हत्या केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: शिर्डी हादरली! साई संस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची एकाच दिवशी हत्या! दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडले मृतदेह
Shirdi Murder: शिर्डीमध्ये आज सकाळी देवस्थानच्या दोघा कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. दोघांचेही मृतदेह हे वेगवेगळ्या ठिकाणी सापडले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: राज्यातील वाघांचे आणि बिबट्याचे अस्तित्व धोक्यात! 'या' कारणांमुळे महिन्याभरात २९ वाघांचा व बिबट्यांचा मृत्यू
Maharashtra Tiger and leopard death : राज्यात गेल्या महिन्याभरात ११ वाघ व १८ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. यात काही मानवी वन्य प्राणी संघर्षामुळे तर काही प्राण्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: एलआयसी एजंट सांगून देशभरातील नागरिकांना लुटणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पुण्यात पर्दाफाश; १५० सिमकार्डसह तिघांना अटक
Pune fake insurance call centre racket : एलआयसीच्या नावाखाली देशभरातील नागरिकांना लाखोंचा गंडा घालण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी 'फ्रॉड कॉल सेंटर'वर छापे टाकत मोठी कारवाई केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून बॉयफ्रेंडने उडवली मजा! अपमान सहन न झाल्याने प्रेयसिने सुपारी देऊन केली हत्या
Viral News : इंटरव्ह्यू चांगला दिला नाही म्हणून बॉयफ्रेंडने मजा उडवल्याने संतापलेल्या प्रेयसीने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : थंडीच्या महिन्यात जाणवणार उन्हाळा! पुढील 3 दिवसांत उकाडा वाढणार, IMD ने दिला अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन दिवसांत तापमानात मोठी वाढ होणार आहे. उकड्यामुळे नागरिक हैराण होणार असून बाहेर पडतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.