मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live February 17, 2025: ठाण्यात मृत व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, अल्पवयीन पीडितेने दिला बाळाला जन्म
Maharashtra Election 2024 News LIVE: ठाण्यात मृत व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, अल्पवयीन पीडितेने दिला बाळाला जन्म
Maharashtra Election News LIVE February 17, 2025: ठाण्यात मृत व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, अल्पवयीन पीडितेने दिला बाळाला जन्म
Updated Feb 17, 2025 10:07 PM IST
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 17 Feb 202504:37 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: ठाण्यात मृत व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, अल्पवयीन पीडितेने दिला बाळाला जन्म
एफआयआरमध्ये कथित आरोपीच्या मृत्यूची वेळ आणि परिस्थिती नमूद करण्यात आली नव्हती. आरोपीने मुंब्रा येथील आपल्या शेजारच्या १७ वर्षीय मुलीशी मैत्री केली आणि जून ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीत खडाखडी सुरूच..! एकनाथ शिंदेंनी स्थापन केला नवा वैद्यकीय सहायता कक्ष, फडणवीसांवर कुरघोडी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रालयात डेप्युटी सीएम वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना केली असून त्याचे प्रमुख आपले निकटवर्तीय मंगेश शिवाटे यांना बनवले आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: साताऱ्याच्या पोराचा नादच खुळा..! वाहतूक कोंडीवर लढवली भन्नाट शक्कल, पॅराग्लायडिंग करत पोहोचला कॉलेजच्या परीक्षेला, VIDEO
Satara News : समर्थला हे धाडसी पाऊल उचलण्यासाठी पाचगणीतील जीपी अॅडव्हेंचर्सचे तज्ज्ञ गोविंद येवले यांची मदत घ्यावी लागली आणि १५-२० मिनिटांत परीक्षा केंद्रावर पोहोचला.
महाराष्ट्र बातम्या News Live: Navi Mumbai Crime: वाल्मिक कराडचं नाव घेत नवी मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेवकाने पोलीस ठाण्यातच केलं विष प्राशन
Maharashtra Politics: नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील भाजपचे माजी नगर सेवक भरत जाधव यांनी वाल्मीक कराडचे नाव घेत पोलिस अधिकाऱ्यांसमोर पोलिस ठाण्यात विष प्यायलं आहे. त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुंब्रा येथे मृत व्यक्तिवर दाखल झाला बलात्काराचा गुन्हा! पीडितेने दिला बाळाला जन्म
Mumbra Crime News : ठाण्यातील मुंब्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला. दरम्यान, त्याचा मृत्यू झाला असून त्याच्यावर मृत्यूनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात ३ बीएचकेमध्ये राहणारी एक महिला अन् ३०० मांजरी सोसायटी धारकांची ठरतेय डोकेदुखी! थेट पालिकेकडे केली तक्रार
Pune Cat Home : पुण्यात हडपसर येथील एका सोसायटीत ३ बीएचके फ्लॅटमध्ये एक महिला ३०० मांजरीसह राहत असून या महिलेमुळे इतर फ्लॅटधारक त्रस्त झाले आहे. त्यांनी या प्रकरणी थेट पोलिसांत व महानगर पालिकेकडे तक्रार केली आहे.