मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 9, 2024: Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात, ७ ते ८ जणांचा मृत्यू
Maharashtra Election News LIVE December 9, 2024: Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात, ७ ते ८ जणांचा मृत्यू
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Mon, 09 Dec 202405:11 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Kurla Bus Accident : कुर्ल्यात भरधाव बस मार्केटमध्ये घुसल्याने भीषण अपघात, ७ ते ८ जणांचा मृत्यू
Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यातून भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. कुर्ला एलबीएस रोडवर भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले. या अपघातात ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती समोर आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Aaditya Thackeray : बेळगाव-कारवार केंद्रशासित प्रदेश करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यापासून रोखण्यात आल्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांनी आजच्या अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.
महाराष्ट्र बातम्या News Live: वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात, “गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, महायुती सरकारकडे मोठी मागणी
Raj Thackeray : लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील तळेगावातील तब्बल ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या बोर्डाने याबद्दल १०३ शेतकऱ्यांना नोटीस बजावली आहे. आता यावरुन राजकारण तापलं आहे. या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ज्वारी पिकाचे विविध आयाम उलगडून दाखवणाऱ्या ‘ज्वारीची कहाणी’चे प्रकाशन
ज्वारीचं पीक हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. तसेच ज्वारी हा आस्थेचा विषय देखील आहे. या पिकाला मध्यवर्ती ठेवून धनंजय सानप यांनी ‘ज्वारीची कहाणी’ हे पुस्तक लिहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: विद्यार्थ्यांना १० वी, १२ वीच्या परीक्षेसह महत्वाची माहिती मिळणार आता मोबाइवर! MSBSHSE तयार केले ॲप
MSBSHSE APP : राज्य मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व सुविधा यासाठी मंडळाने 'एमएसबीएसएचएसई हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपवर बोर्डाच्या परीक्षेची माहिती देखील मिळणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी ‘ॲनिडर’ यंत्र बनले लाखो गावकऱ्यांसाठी जीवन रक्षक!
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्यांची प्रचंड संख्या वाढल्याने मानवी वस्त्यांमध्ये वावर वाढला आहे. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाने काही गावांमध्ये सायरनचा आवाज करणारे ‘ॲनिडर’ यंत्र लावले आहे. जाणून घेऊ या यंत्राविषयी.
महाराष्ट्र बातम्या News Live: कोल्हापूर कर्नाटक सीमेवर राडा! उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना पोलिसांनी सीमेवरच अडवलं, बेळगावला जाण्यावर कार्यकर्ते ठाम
Karnataka Marathi Mahamelava : कर्नाटकमधील बेळगाव येथे आज महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. आज कोल्हापूर बेळगाव सीमेवर मोठा राडा झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Rahul Narwekar : महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड
Rahul Narwekar unopposed elected Maharashtra Assembly speaker : गेल्या अडीच वर्षांपासून विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी बिनरोध निवड करण्यात आली आहे. आवाजी मतदानाने त्यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: भटक्या कुत्रांपासून त्रस्त आहात! 'या' ठिकाणी करा तक्रार, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबात शहरात पालिकेची आहे विशेष सेवा
Stray Dogs Issue : राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात काही नागरिकांच्या व लहान मुलांचा मृत्यू देखील झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी राज्यातील महत्वाच्या पालिकांनी उपाय योजना सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: खगोलप्रेमींसाठी महत्वाची बातमी! १३ आणि १४ डिसेंबर होणार जेमीनीड्सचा उल्कावर्षाव
Geminids Meteor Shower in December : खगोलप्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या १३ आणि १४ डिसेंबरला उल्का वर्षाव होणार असून तो डोळ्याने पाहता येणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: कबुतरांना खाद्य टाकताय तर ही बातमी वाचा! पुणे महानगर पालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड; रोगराई वाढत असल्याने निर्णय
Pune news : पुण्यात कबुतरांची संख्या वाढत चालली असून त्यामूळे रोगराई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याची दखल पुणे महानगर पालिकेने घेतली आहे. त्यामुळे या पुढे कबुतरांना खाद्य टाकल्यास पालिका दंड वसूल करणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा हुडहुडी! थंडी परतली; तापमानात मोठी घट, IMD ने दिली महत्वाची अपडेट
Maharashtra Weather Update : राज्यात तापमानात मोठी घट झाली आहे. तब्बल चार अंशांनी तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडीने पुनरागमन केलं असून पुढील काही दिवस थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.