मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 8, 2024: Ramdas Athawale : मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? रामदास आठवलेंचा सवाल, मनसेचा पलटवार
Maharashtra Election News LIVE December 8, 2024: Ramdas Athawale : मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? रामदास आठवलेंचा सवाल, मनसेचा पलटवार
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Sun, 08 Dec 202403:59 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Ramdas Athawale : मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? रामदास आठवलेंचा सवाल, मनसेचा पलटवार
Ramdas Athawale News : राज ठाकरे महायुतीत येतील असं वाटत नाही. पुढे काय निर्णय होणार? हे मला माहिती नाही. पण महायुतीत त्यांना घेण्यास फायदा नाही. मी महायुतीत असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?, असं रामदास आठवले म्हणाले.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sharad Pawar : आयोगानं देशातील निवडणूक पद्धतीत बदल करावा, मारकडवाडीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar in Markadwadi : ईव्हीएम बाबत लोकांच्याच मनात शंका आल्याने आता निवडणूक आयोगाने निवडणूक पद्धतीत बदल केला पाहिजे, असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी मारकडवाडीत केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Sushma andhare : "तुम्ही EVM सेट नाही केले तर..."; सुषमा अंधारेंचा भाजप समर्थकांवर संताप
Sushma Andhare On EVM : महाराष्ट्राच्या निकालानंतर देशभरात ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक पक्षांनी तसेच नेत्यांनी ईव्हीएम हटवण्याची मागणी लावून धरली आहे. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप समर्थकांना सवाल करत संताप व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Rahul Narwekar : विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर! निवड निश्चित होताच विरोधी पक्षनेते पदाबाबत मोठं वक्तव्य
Rahul Narvekar Assembly Speaker : राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. दिलेल्या मुदतीत केवळ राहुल नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उद्या (९ डिसेंबर) राहुल नार्वेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: karnataka Govt: बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी
Karnataka Marathi Mahamelava: कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले. पण या महामेळ्यात महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रवेश नाही.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ambernath: बदलापूरनंतर आता अंबरनाथ! शिक्षकाकडून तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार
School Teacher Sexually Abusing Minor Student: अंबरनाथ येथे नऊ ते पंधरा वयोगटातील तीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.