मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 31, 2024: अजित पवार आहेत कुठे? मुंडे काल मुख्यमंत्र्यांना भेटतात अन् आज वाल्मिक हजर कसा होतो? संभाजीराजेंनी व्यक्त केली शंका
Maharashtra Election News LIVE December 31, 2024: अजित पवार आहेत कुठे? मुंडे काल मुख्यमंत्र्यांना भेटतात अन् आज वाल्मिक हजर कसा होतो? संभाजीराजेंनी व्यक्त केली शंका
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 31 Dec 202401:49 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवार आहेत कुठे? मुंडे काल मुख्यमंत्र्यांना भेटतात अन् आज वाल्मिक हजर कसा होतो? संभाजीराजेंनी व्यक्त केली शंका
Sambhaji Raje On Dhananjay Munde : वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मुंडे विरोधकांच्या निशाण्यावर असताना त्यांचे पक्षाध्यक्ष अजित पवार मौन बाळगून आहेत, यावर संभाजीराजे छत्रपती यांनी भाष्य केलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: शासकीय योजनांच्या लाभासाठी आरसीएच नोंद महत्वाची! अन्यथा मिळणार नाही फायदा
RCH News : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत योजनांचा लाभ घेण्यासाठी आरसीएच नोंद महत्वाची आहे. ही नोंद न केल्यास शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
महाराष्ट्र बातम्या News Live: तळीरामांना दारू जास्त झाल्यास हॉटेल चालक सोडणार घरी; पुणे हॉटेल्स असोसिएशनचा निर्णय
Pune New Year Celebration : पुण्यात आज जल्लोषात नवीन वर्ष साजरे केले जाणार आहे. मोठ्या पार्ट्या आज आयोजित करण्यात आल्या असून तळीरामांना दारू जास्त झाल्यास हॉटेल चालक त्यांना घरी सोडणार आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: नातेवाईकांना बाहेर थांबवत नराधम भोंदुबाबाचं मुलीवर अत्याचार! कल्याणमधील धक्कादायक घटना
Kalyan Crime : कल्याणमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. एका भोंदूबाबाने लहान मुलीवर अत्याचार केले आहे. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
Pune balloons Issue : पर्यावरणाची हानी होत असल्याचे कारण देत आकाशात सोडल्या जाणाऱ्या फुग्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पुण्यातील नागरिकांनी केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: थर्टी फर्स्टसाठी पुण्यात ३ हजार पोलिस तैनात! बेशिस्त वाहन चालक, मद्यपी चालकांवर होणार कारवाई
Pune 31st December Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच लगबग सुरु असताना पुण्यात देखील नवीन वर्षाचं जंगी स्वागत होणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुचित घटना होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: New Year Celebration: गडकिल्ले, टेकड्यांवर 'न्यू इयर सेलिब्रेशन’ केल्यास होणार कारवाई! वन विभागाचा इशारा
New Year Celebration : आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जोरदार सेलिब्रेशन केले जाणार आहे. हे सेलिब्रेशन गडकिल्ले टेकड्यांवर केल्यास थेट कारवाईचा इशारा वनविभागाने दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: जेजुरीतील सोमवती यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा भीषण अपघात; दोघे ठार, १३ भाविक जखमी
Saswad Accident : आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी येथून काही भाविक टेम्पोने जेजूरी येथे आले होते. या टेम्पोची समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघे ठार झाले.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप; सेलिब्रेशनच्या नावाखाली सुरू केलेल्या प्रकारावर टीका
Pune News : पुण्यात नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका पबने पबमध्ये येणाऱ्या तरुणांना कंडोम आणि ओआरएक्सचे पाकीट वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : नव्या वर्षात थंडी वाढणार! तापमानात होणार मोठी घट; IMD ने दिला महत्वाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यावरील पावसाचे सावट दूर झाले आहे. आता राज्यात थंडीचे पुनरागमन होणार आहे. त्यामुळे कपाटात ठेवलेले गरम कपडे पुन्हा बाहेर काढावे लागणार आहे.