मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 3, 2024: Dry Day Alert : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला ‘ड्राय डे’ जाहीर
Maharashtra Election News LIVE December 3, 2024: Dry Day Alert : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला ‘ड्राय डे’ जाहीर
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Tue, 03 Dec 202405:21 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Dry Day Alert : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला ‘ड्राय डे’ जाहीर
Mahaparinirvan Din Dry Day : महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुटी जाहिर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत. तसेच ६ डिसेंबर रोजी मुंबईत ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची BMC साठी नवी रणनिती, बैठकीत काय ठरलं?
Uddhav Thackeray News : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील रणनिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mahaparinirvan Din 2024: मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील ३ दिवसांच्या वाहतुकीमधील बदल
Mahaparinirvan Din 2024 : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादर परिसरात लाखोंची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतूक नियमावली जाहीर करून काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीचा खातेवाटपाचा नवा फॉर्म्युला आला समोर, भाजप २२ खाती ठेवणार; शिंदे आणि अजित पवारांना काय मिळणार?
Mahayuti Government : महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपकडे गृह तसेच महसूल आदि महत्वाची मंत्रिपदे राहण्याची शक्यता आहे. तसेच भाजपकडे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती असण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महापरिनिर्वान दिनानिमित्त चैत्यभूमीला जाणाऱ्यांसाठी 'बेस्ट'चा बेस्ट निर्णय, दादरमधून दर १५ मिनिटाला सुटणार बस
Mahaparinirvan Din BEST service : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांच्या सोईसाठी बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. चैत्यभूमीसाठी दर १५ मिनिटांनी गाड्या सोडल्या जाणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पोलिसांच्या दबावामुळे मारकडवाडीतील बॅलेट पेपर व्होटिंगची रद्द; EVM विरोधात ग्रामस्थांनी पुकारला होता एल्गार!
Markadwadi Village vothing : माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये आज मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेतले जाणार होते. मात्र, पोलिस प्रशासनाने यावर बंदी घालत गावात जमाबबंदी लागू केल्याने हे वोटिंग रद्द करण्यात आले.
महाराष्ट्र बातम्या News Live: देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नागपूरच्या टेलरने शिवले आवडत्या रंगाचे खास कोट !
Devendra Fadnavis News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे गुरुवारी पाच तारखेला शपथ घेणार आहे. या साठी आझाद मैदानावर तयारी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. नागपूर येथील एका टेलरने त्यांच्यासाठी खास त्यांच्या आवडत्या रंगाचे कोट शिवले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: आझाद मैदानावर शपथविधीची जोरदार तयारी! मुख्यमंत्रीपदासह आज मंत्रीमंडळ अंतिम होण्याची शक्यता
Maharashtra CM : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची जोरदार तयारी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू आहे. शपथविधीची वेळ निश्चित करण्यात आली असून ५ तारखेला संध्याकाळी हा सोहळा होणार आहे. मात्र, नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र बातम्या News Live: गोळ्या घालत्या तरी मतपत्रिकेवरच मतदान घेणार! मारकटवाडीकर निर्णयावर ठाम; गावात जमावबंदीचे आदेश
Markadwadi Voting : माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये आज मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ग्रामस्थ ठाम आहेत. काही झाले तरी हे मतदान होणार असे ग्रामस्थांनी जाहीर केलं आहे. यामुळे या गावात जमाबबंदी लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यावर पावसाचे सावट! पुण्यासह १० जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बरसणार
Maharashtra Weather Update : ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यात कहर केला आहे. पावसामुळे पुर आला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा राज्याच्या हवामानावर देखील परिणाम झाला असून पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.