मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 26, 2024: Jalna Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट, दोन जण ठार!
Maharashtra Election News LIVE December 26, 2024: Jalna Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट, दोन जण ठार!
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 26 Dec 202403:45 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Jalna Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट, दोन जण ठार!
Jalna Bageshwari Sugar Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: Bhandara: परीक्षेत पास करण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी, भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार!
Bhandara Government Nursing College: भंडारा येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या पालकांनी प्राचार्याला चोप दिला. प्राचार्यावर विद्यार्थिनींकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Car Fire: मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनी कारला आग; गौतम सिंघानिया यांची पोस्ट
Lamborghini Catches Fire In Mumbai: मुंबईतील कोस्टल रोडवर धावत्या लॅम्बोर्गिनी कारला आग लागल्याचा व्हिडिओ रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Viral News : समुद्रात गर्लफ्रेंडसोबत पोहत असताना बुडाला YouTuber रणवीर अलाहबादिया! IPS आधिकारी बनला देवदूत, वाचवलं
Viral News : प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादिया हा त्याकह्या प्रेयसीसोबत गोव्यात समुद्रात पोहोत असतांना अचानक त्याला धाप लागून तो बेशुद्ध पडला. यावेळी एका आयपीएस अधिकाऱ्याने त्याचे व त्याच्या प्रेयसीचे प्राण वाचवले. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: कल्याणनंतर पुणे हादरले! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करून केली भयंकर हत्या; मृतदेह घरातच लवपले
Pune Rajgurungar Crime : पुण्यात राजगरूनगर येथे दोन लहान बहिणींची हत्या करून त्यांचा मृतदेह घरच्या वर ड्रममध्ये लपवून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी आचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: बीडटचा कलेक्टर असताना लोडेड रिव्हॉल्वर बाळगायचोः अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा
सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात काम करत असताना आपण लोडेड रिव्हॉल्व्हर जवळ बाळगायचो, असं माजी अधिकारी सदानंद कोचे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: रक्षकचं बनला भक्षक! लोणावळ्यात पाच वर्षांच्या चिमुकलीवर मद्यधुंद पोलिसांनी केला लैंगिक अत्याचार
Pune Crime News : कल्याण व संभाजीनगर येथे मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना आता लोणावळ्यात देखील एका पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: साताऱ्याच्या जवानाचा पुंछमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्यू कामेरी गावावर शोककळा
Maharashtra Soldier Martyred : जम्मू काश्मीरमधील पूंछ इथं सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळून ५ जवानांना वीरमरण आलं. या अपघातात साताऱ्यातील जवान शुभम घाडगे यांनाही वीरमरण आलं असून कामेरी गावावर शोककळा पसरली आहे
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! अवकाळी पाऊस व थंडीच्या लाटेचा IMD चा इशारा
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान शास्त्र विभागाने पुढील काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या सोबतच वर्षाच्या शेवटी व नवीन वर्षाच्या सुरवातीला थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.