मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 18, 2024: Vasai Accident: शाळेतून परतत असताना भरधाव दुचाकीनं उडवलं, वसईतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
Maharashtra Election News LIVE December 18, 2024: Vasai Accident: शाळेतून परतत असताना भरधाव दुचाकीनं उडवलं, वसईतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 18 Dec 202404:08 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: Vasai Accident: शाळेतून परतत असताना भरधाव दुचाकीनं उडवलं, वसईतील १४ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
Vasai Bike Accident: वसई पश्चिम येथील गोन्साल्विस गार्सिया कॉलेजसमोरील रस्त्यावर भरधाव दुचाकीने १४ वर्षीय मुलीला उडवून घटनास्थळावरून पळ काढला.
महाराष्ट्र बातम्या News Live: अदानीचं नाव घेतलं की विरोधकांवर कोसळणारे भाजपवाले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शहांचं काय करणार?; उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray On Amit Shah Comment : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच, भाजप व आरएसएसनं यावर खुलासा करायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: छगन भुजबळांच्या आक्रमक पावित्र्यानंतर अजित पवार नरमले! भुजबळांची मनधरणी करायला तीन नेत्यांना नाशिकला पाठवणार
Chhagan Bhujbal : ‘जहा नहीं चैना, वहा नहीं रहाना' या वक्तव्यावरून चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी बुधवारी येवला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जनतेशी चर्चा करून महायुतीत राहायचे की नाही या बाबत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यातील प्रसिद्ध शाळेत चार वर्षांच्या विद्यार्थीनीवर नृत्य प्रशिक्षकाने केला अत्याचार! पालकांचा संताप
Pune Warje Malwadi Crime news : पुण्यात वारजे माळवाडी येथील नामाकींत शाळेत एका चार वर्षांच्या मुलीवर नृत्य प्रशिक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : उत्तरेतील थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट! पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव गारठले
Maharashtra Weather Update : सध्या उत्तर भारतात कमालीची थंडी पडली आहे. तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.