मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 12, 2024: 'राज्यात अल्पसंख्यंकांवरील हल्ले रोखावे'- कॉंग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Election News LIVE December 12, 2024: 'राज्यात अल्पसंख्यंकांवरील हल्ले रोखावे'- कॉंग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Thu, 12 Dec 202402:33 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: 'राज्यात अल्पसंख्यंकांवरील हल्ले रोखावे'- कॉंग्रेसचे माजी खासदार हुसैन दलवाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्रात अल्पसंख्याक नागरिक आणि त्यांच्या शाळांवर होत असलेले हल्ले थांबवावे अशी मागणी कॉंग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ‘जे जे होईल ते पाहा, जे काही मिळेल ते घ्या, अन्यथा घरी आराम करा’; एकनाथ शिंदे-अजित पवारांना ‘या’ नेत्याचा जबरी टोला
Maharashtra Politics : मंत्रिमंडळाचे खातेवाटप अद्याप झालेले नाही. एकनाथ शिंदे महत्वाच्या खात्यासाठी अडून बसलेले दिसून येत आहेत. यावरून महाविकास आघाडीतील नेते शिंदेसेना व अजित पवार गटावर टीका करत आहेत. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत खोचक टोला लगावला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ladki Bahin Yojana : लाखो बहिणी होणार नावडत्या..! लाडकी बहीण योजनेतील १६ लाख अर्जांची होणार छाननी
Ladki Bahin Yojana Update : अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न तसेच घरात चारचाकी वाहन असलेल्या महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून यामुळे आता अशा अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीत नियमबाह्य आढळणारे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले, पण एकनाथ शिंदे मुंबईतच! मंत्रिमंडळ कसं ठरणार?
Maharashtra Cabinet : खातेवाटपावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस, अजित पवार दिल्लीला गेले असले तरी एकनाथ शिंदे मुंबईतच थांबल्यानं पेच निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ramdas Athawale: संविधानचा अवमान खपवून घेणार नाही; परभणी येथील घटनेवर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया
Ramdas Athawale On Parbhani Violence: परभणी हिंसाचारप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.