मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra Election News Live December 11, 2024: Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी
Maharashtra Election News LIVE December 11, 2024: ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी
Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.
Wed, 11 Dec 202405:34 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी, सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी
Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचं, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत आता स्वत: महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहाकाऱ्याला डच्चू; कोण आहेत नवीन प्रमुख?
CM Relief Fund - राज्यातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांना आर्थिक मदत देणाऱ्या राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’च्या प्रमुखपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: High Court News : अविवाहित मुलीलाही वडिलांकडून पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय
Mumbai High Court : मुलगी पूर्णपणे स्वावलंबी किंवा तिचं लग्न होत नाही तोपर्यंत वडिलांकडून तिला पोटगी म्हणजेच पालनपोषणाचा खर्च मिळण्याचा हक्क आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका प्रकरणात दिला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Accident : मुंबईत आणखी एक भीषण अपघात; CSMT भागात बेस्ट बसने एकाला चिरडलं
Mumbai Best Bus Accident : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरामध्ये बेस्ट बसने एकाला उडवलं. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: ‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ पुस्तकाला डाॅ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार
‘कहाणी पाबळच्या विज्ञान आश्रमाची’ या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणतर्फे दिला जाणारा डाॅ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: BJP operation Lotus: महाराष्ट्रात भाजप पुन्हा ऑपरेशन लोटसच्या तयारीत? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष संकटात
BJP Operation Lotus : शरद पवार यांच्या पक्षाचे अनेक खासदार भाजपच्या संपर्कात असून ते पक्षांतर करू शकतात, अशी माहिती आहे. या खासदारांचे म्हणणे आहे की, राज्यात तसेच केंद्रात भाजपची सत्ता आहे.अशा स्थितीत भाजपसोबत जाऊन परिसराचा विकास करणे सोपे जाणार आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: परभणी बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून दुकानं, वाहनांवर दगडफेक; जाळपोळ, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
Parbhani Agitation : परभणी शहरातील जिंतूर रोडवर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनाला आता हिंसक वळण आले आहे. पोलिस आणि आंदोलक आमनेसामने आल्याने तणावपूर्ण स्थिती आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: महायुतीकडून सत्तावाटप निश्चित; गृह, महसूल भाजपकडेच, शिंदे यांना नगरविकास मिळण्याची शक्यता
Mahayuti Cabinet Expansion: भाजपकडे कॅबिनेटच्या २२, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे ११ आणि १० मंत्रिपदे मिळणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.