महाराष्ट्रातील ५० टक्के मतदारसंघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप, काँग्रेसने किती जणांना दिली संधी ?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्रातील ५० टक्के मतदारसंघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप, काँग्रेसने किती जणांना दिली संधी ?

महाराष्ट्रातील ५० टक्के मतदारसंघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप, काँग्रेसने किती जणांना दिली संधी ?

Nov 12, 2024 08:55 AM IST

Maharashtra vidhan sabha election : राज्यातील १५० हून अधिक विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही. सुमारे ५० जागांसाठी एकच मुस्लिम उमेदवार उभा आहे. राज्यात निवडणूक रिंगणात असलेल्या ४ हजार १३६ उमेदवारांपैकी केवळ ४२० उमेदवार मुस्लीम आहेत.

महाराष्ट्रातील ५० टक्के मतदार संघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप, काँग्रेसने किती जणांना दिली संधी ?
महाराष्ट्रातील ५० टक्के मतदार संघात एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक रिंगणात नाही! भाजप, काँग्रेसने किती जणांना दिली संधी ? (Ajit Pawar-X)

Maharashtra vidhan sabha election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुस्लीम उमेदवारांची संख्या खूपच कमी असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील २८८ जागांपैकी निम्म्याहून अधिक जागांवर एकही मुस्लिम उमेदवार नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.  प्रमुख पक्षांपैकी काँग्रेसने नऊ मुस्लीम उमेदवार उभे केले आहेत. तर भारतीय जनता पक्षाने  एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. राज्यात २० नोव्हेंबररोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. १७ नोव्हेंबरला प्रचाराची सांगता होणार आहे. 

राज्यात किती मुस्लिम उमेदवार ? 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राज्यातील १५० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथे एकही मुस्लिम उमेदवार नाही. सुमारे ५० जागांसाठी एकच मुस्लिम उमेदवार आहे. राज्यात निवडणूक रिंगणात असलेल्या ४ हजार १३६ उमेदवारांपैकी केवळ ४२० मुस्लीम आहेत. विशेष म्हणजे यातील निम्म्याहून अधिक अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

कोणत्या पक्षाने किती मुस्लिम उमेदवारांना दिली संधी 

महाराष्ट्रात काँग्रेसने ९ मुस्लीम उमेदवारांना तिकिट देऊन उमेदवारी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ मुस्लिम उमेदवारांना निवडणूक रिंगणात उभे केले आहे.  राज्यात सर्वाधिक १६ मुस्लीम उमेदवार उभे करणारा पक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम म्हणजेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन आहे. छोट्या पक्षांचे १५० मुस्लीम उमेदवार आहेत. ४२० मुस्लिम उमेदवारांपैकी २१८ मुस्लिम उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

सर्वात जास्त कुठे आहेत मुस्लिम उमेदवार 

मालेगावमध्ये सर्व १३ उमेदवार मुस्लीम आहेत. औरंगाबाद पूर्वमधून एकूण २९ उमेदवारांपैकी १७ उमेदवार मुस्लिम आहेत. विशेष म्हणजे येथे तीन महिलाही आहेत. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम महिला उमेदवारांची संख्या अवघी २२  आहे. २८८ जागांपैकी २७० जागांवर एकही मुस्लिम महिला उमेदवार नाही.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती

राज्यात मोठी लढत सत्ताधारी महायुती आणि विरोधी आघाडी महाविकास आघाडी यांच्यात आहे. एकीकडे महायुतीत शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस चा समावेश आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना (यूबीटी), ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (सपा) आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहेत.

Whats_app_banner