Maharashra election exit polls 2024 :एक्झिट पोल कधी जाहीर होणार? मतदानाच्या टक्केवारीनं वाढवली उत्सुकता
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashra election exit polls 2024 :एक्झिट पोल कधी जाहीर होणार? मतदानाच्या टक्केवारीनं वाढवली उत्सुकता

Maharashra election exit polls 2024 :एक्झिट पोल कधी जाहीर होणार? मतदानाच्या टक्केवारीनं वाढवली उत्सुकता

Nov 20, 2024 07:41 PM IST

Maharashtra election exit polls 2024 : महाराष्ट्रात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व २८८ जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली आहे.

Maharashtra election exit polls 2024
Maharashtra election exit polls 2024 (UDAY DEOLEKAR)

Maharashtra election exit polls 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाची वेळ सहा वाजेपर्यंत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यभरात ४५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं आहे. पुढच्या तीन तासांत हे मतदान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता मतदानानंतरच्या एक्झिट पोलकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे एक्झिट पोल ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात बुधवारी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व २८८ जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप प्रणित महायुती आघाडी आणि विरोधी पक्ष म्हणजेच महाविकास आघाडी यांच्या कडवी लढत होणार आहे. गेल्या निवडणुकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात मोठा बदल झाला आहे. मागील काही काळात महाराष्ट्रातील आघाडीच्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने काँग्रेसशी जुळवून घेण्यासाठी भाजपापासून फारकत घेतली आहे. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये देखील अंतर्गत फूट पडून दोन पक्ष निर्माण झाले आहेत. यामुळेच या निवडणूक लढतीला विशेष महत्त्व आले आहे. 

Maharashtra Elections : मुंबई शहर व उपनगरात ३ वाजेपर्यंत किती मतदान? आकडेवारी नेमकं काय सांगते? पाहा!

महाराष्ट्रात चुरशीची लढत

यंदा राज्यात ९.६ कोटी मतदार आहेत, ज्यात २०.९ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. याचाच अर्थ हे मतदार १८ ते १९ वयोगटातील आहे. तर, २० ते २९ वयोगटातील १.८ कोटी मतदारांचा यामध्ये समावेश आहे. यंदाची लढत भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट असलेली महायुती आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना एकत्र आणणारी महाविकास आघाडी यांच्यात होणार आहे. पहिल्यांदाच या निवडणुकीत दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष पाहायला मिळणार आहेत.

प्रमुख उमेदवार आणि मतदारसंघ 

> महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेकडून कोपरी-पाचपाखाडीमधून जागा लढवत आहेत. 

> काँग्रेसचे नाना पटोले साकोलीतून निवडणूक लढवत आहेत.

> भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढवत आहेत.

> शिवसेनेचे आदित्य ठाकरे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरळीतून लढत आहेत.

> एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मिलिंद देवरा वरळीतून निवडणूक लढवत आहेत. 

> अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्व येथून लढत आहेत. 

> अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नवाब मलिक मानखुर्द शिवाजी नगरमधून लढत आहेत.

> राष्ट्रवादीचे अजित पवार बारामतीतून निवडणूक लढत आहेत. 

> अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील तासगावमधून जागा लढवत आहेत.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर