virar cash for votes : नेमकं चाललंय काय? पैसे वाटपाच्या राड्यानंतर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून निघून गेले!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  virar cash for votes : नेमकं चाललंय काय? पैसे वाटपाच्या राड्यानंतर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून निघून गेले!

virar cash for votes : नेमकं चाललंय काय? पैसे वाटपाच्या राड्यानंतर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून निघून गेले!

Nov 19, 2024 05:51 PM IST

virar cash for votes marathi news : पैसे वाटपावरून चार तास आमनेसामने आलेले विनोद तावडे व हितेंद्र ठाकूर शेवटी एकाच गाडीतून निघून गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

नेमकं चाललंय काय? पैसे वाटपाच्या राड्यानंतर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून निघून गेले!
नेमकं चाललंय काय? पैसे वाटपाच्या राड्यानंतर विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून निघून गेले!

Vinod Tawde marathi news : विरारमधील हॉटेलमध्ये झालेल्या ‘कॅश फॉर व्होट्स’ प्रकरणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांना पैसे वाटताना पकडल्यामुळं मोठा राडा झाला होता. मात्र, तीन-चार तासांच्या या राड्यानंतर ठाकूर आणि तावडे एकाच गाडीतून गेल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

विरारमधील विवांत हॉटेलमध्ये विनोद तावडे हे भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत असल्याची माहिती बविआच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर आमदार क्षितीज ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते तिथं पोहोचले. तिथं तावडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरलं. तिथं त्यांना डायरी आणि बॅग सापडली. त्यात पैशांच्या नोटा असल्याचं समोर आलं. त्यामुळं मोठी खळबळ उडाली.

बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांच्यासमोरच चोर-चोर अशा घोषणा दिल्या. तावडे हे ५ कोटी रुपये घेऊन आल्याचा दावा बविआनं केला. यावेळी तावडे आणि बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. हितेंद्र ठाकूर यांनी तावडे यांच्यावर जोरदार टीका केली. ते भाजपचे राष्ट्रीय नेते आहेत. पण त्यांना अजिबात लाज नाही, अशी तोफ ठाकूर यांनी डागली. निवडणूक आयोग या सगळ्याची दखल घेईपर्यंत त्यांना सोडणार नाही, असं ठाकूर यांनी सांगितलं. त्यानंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली.

निवडणूक आयोगाचा आदेश

तावडे आणि ठाकूर यांनी पत्रकार परिषदेला सुरुवातही केली. निवडणूक आयोग याची चौकशी करेल, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली. तर, तावडे इथं कशाला आले? १० लाख रुपये कशाला आणले, असा प्रश्न ठाकूर यांनी केला. हे सगळं सुरू असतानाच निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही पत्रकार परिषद थांबवण्यात आली.

पत्रकार परिषद थांबल्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे एकाच गाडीतून निघून गेले. त्यामुळं सगळेच बुचकळ्यात पडले. याआधी चार तास जे सुरू होतं, ते नेमकं काय होतं, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. विरोधकांनी मात्र या प्रकरणावरून भाजप व महायुतीवर टीकेची झोड उठवली आहे.

Whats_app_banner