मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gram Panchayat Election : १,१६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.. थेट जनतेतून सरपंच निवड

Gram Panchayat Election : १,१६६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर.. थेट जनतेतून सरपंच निवड

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 07, 2022 06:50 PM IST

GramPanchayatElection : महाराष्ट्र निवडणूक आयोगाने राज्यातील १८जिल्ह्यांमधील ग्रामपंतायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. आज निवडणूक आयोगाने राज्यातील१हजार१६६ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई–महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय प्रलंबित असताना. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने राज्यातील १८जिल्ह्यांमधील ग्रामपंतायत निवडणुकीचा (GramPanchayatElection ) कार्यक्रम घोषित केला आहे. आज निवडणूक आयोगाने राज्यातील१हजार१६६ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यानुसार पुढील महिन्यात १३ऑक्टोबरला मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे,अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

दसऱ्यानंतर राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील तब्बल १८ जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये कोकणातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या विविध मुद्यांवरून तापलेलं राजकारण पुढील महिन्यातही कायम राहण्याची चिन्हे आहेत.

राज्य सरकारनेमहाविकास आघाडी सरकारचा निर्णय बदलून थेट जनतेतूनसरपंच निवडीचा निर्णयकाही दिवसांपूर्वी घेतला होता. सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे राज्यातील१८जिल्ह्यांतील८२तालुक्यांमधील १हजार१६६ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी१३ऑक्टोबर २०२२रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून१४ऑक्टोबर२०२२रोजी मतमोजणी होईल,अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

या निवडणुकीसाठी राज्य सरकारने नेमलेल्यासमर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागाआरक्षित आहेत.

असा असेल ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम –

  • १३सप्टेंबर२०२२रोजी निवडणुकीचीअधिसूचना प्रसिद्धकरण्यात येईल.
  • नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा कालावधी२१ते२७सप्टेंबर२०२२. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे२४व२५सप्टेंबर२०२२रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.
  • प्राप्त अर्जांचीछाननी२८सप्टेंबर२०२२रोजीहोईल.
  • नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत३०सप्टेंबर२०२२रोजी दुपारी३वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
  • मतदान१३ऑक्टोबर२०२२रोजी सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच या वेळेत पार पडेल.नक्षलग्रस्त भागात दुपारी३वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
  • मतमोजणी१४ऑक्टोबर२०२२रोजी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या