Maharashtra Election Live updates : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान; मतदानासाठी तरुणाईचा उत्साह
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Election Live updates : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान; मतदानासाठी तरुणाईचा उत्साह

Maharashtra Election Live updates : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान; मतदानासाठी तरुणाईचा उत्साह

Nov 20, 2024 09:06 PM IST

Maharashtra Assembly Election LIVE Updates: राज्यात आज लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. २८८ विधानसभा मतदारसंघातील ४१३६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

राज्यात आज लोकशाहीचा उत्सव! २८८ मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य होणार मंतपेटीत बंद
राज्यात आज लोकशाहीचा उत्सव! २८८ मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य होणार मंतपेटीत बंद

विधानसभा निवडणूक लाईव्ह अपडेट : महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. ही मतदान एका टप्प्यात पार पडणार आहे. राज्यातील २८८ जागांवर एकूण ४१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. मतदानाची प्रक्रिया ६ वाजेपर्यंत चालणार आहे. तर निवडणुकीचे निकाल हे २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे राज्यात महायुती की महाविकास आघाडी बाजी मारणार हे या दिवशी स्पष्ट होणार आहे.

राज्यात गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. प्रचार संपल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. सत्ता आपल्या ताब्यात राहावी यासाठी सर्वजण झटत आहेत.

पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.

पर्यंतचे मतदान

वडगाव शेरी 26.08 %

शिवाजीनगर 23.46%

पुणे कॅन्टोन्मेंट 25.40%

पर्वती 27.19%

कोथरूड 27.60%

खडकवासला 29.05%

कसबा 31.67%

हडपसर 24.15%

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:

अहमदनगर - ३२.९० टक्के,

अकोला - २९.८७ टक्के,

अमरावती - ३१.३२ टक्के,

औरंगाबाद- ३३.८९ टक्के,

बीड - ३२.५८ टक्के,

भंडारा- ३५.०६ टक्के,

बुलढाणा- ३२.९१ टक्के,

चंद्रपूर- ३५.५४ टक्के,

धुळे - ३४.०५ टक्के,

गडचिरोली-५०.८९ टक्के,

गोंदिया - ४०.४६ टक्के,

हिंगोली -३५.९७ टक्के,

जळगाव - २७.८८ टक्के,

जालना- ३६.४२ टक्के,

कोल्हापूर- ३८.५६ टक्के,

लातूर _ ३३.२७ टक्के,

मुंबई शहर- २७.७३ टक्के,

मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,

नागपूर - ३१.६५ टक्के,

नांदेड - २८.१५ टक्के,

नंदुरबार- ३७.४० टक्के,

नाशिक - ३२.३० टक्के,

उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,

पालघर-३३.४० टक्के,

परभणी-३३.१२टक्के,

पुणे - २९.०३ टक्के,

रायगड - ३४.८४ टक्के,

रत्नागिरी-३८.५२ टक्के,

सांगली - ३३.५० टक्के,

सातारा -३४.७८ टक्के,

सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,

सोलापूर - २९.४४,

ठाणे -२८.३५ टक्के,

वर्धा - ३४.५५ टक्के,

वाशिम - २९.३१ टक्के,

यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.

 

 

 

कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी; युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवारांचे गंभीर आरोप

बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी गंभीर आरोप केले आहे. कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असून दमदाटी करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सोबतच मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेल्या स्लीप वाटल्या जात असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं पवार म्हणाल्या.

 

Manoj jarange patil : मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रत्येकाने मतदान करून आपल्या हक्काचा माणूस बसवला पाहिजे. मतदानाचा उठाव करावा लागेल असे जरांगे म्हणाले.

धुळे जिल्ह्यात मतदान यंत्रामध्ये बिघाड

धुळे जिल्ह्यात दोन ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झाला. साक्री मतदार संघातील जामदा येथे काही काळ मतदान केंद्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबले होते. तर धुळे शहरातील विद्यावर्धिनी कॉलेज येथील मतदान केंद्रामध्ये बिघाड झाल्याने मतदान रखडले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि आई सरिता फडणवीस यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे...

अहमदनगर - १८.२४ टक्के,अकोला - १६.३५ टक्के,अमरावती - १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड - १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे - २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया - २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव - १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के,लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर - १८.९० टक्के,नांदेड - १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक - १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे - १५.६४ टक्के,रायगड - २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के,सांगली - १८.५५ टक्के,सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,सोलापूर - १५.६४,ठाणे१६.६३ टक्के,वर्धा - १८.८६ टक्के,वाशिम - १६.२२ टक्के,यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.

पुणे जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.६४ टक्के मतदान

वडगाव शेरी 15. 48%

शिवाजीनगर 13.21%

पुणे कॅन्टोन्मेंट 14.12%

पर्वती 15.91%

कोथरूड 16.05%

खडकवासला 17.05%

कसबा 18.33%

हडपसर 11.47%

मुंबईतील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत अंदाजे १५.७८ टक्के मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत अंदाजे १५.७८ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सकाळी ११.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)

१७८-धारावी - १३.२८ टक्के

१७९-सायन-कोळीवाडा - १२.८२ टक्के

१८०- वडाळा – १७.३३ टक्के

१८१- माहिम – १९.६६ टक्के

१८२-वरळी – १४.५९ टक्के

१८३-शिवडी – १६.४९ टक्के

१८४-भायखळा – १६ .९८ टक्के

१८५- मलबार हिल – १९.७७ टक्के

१८६- मुंबादेवी - १४.९५ टक्के

१८७- कुलाबा - १३.०३ टक्के

###

अजित पवार एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार असल्याचा पुत्र जय पवार यांना विश्वास

सगळे बारामतीकर पूर्वीपासून सगळ्यांवर प्रेम करतात. लोकसभेला साहेब आणि विधानसभेला दादा हे समीकरण लोकांमध्ये आहे. त्यामुळे अजित पवार हे एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील. असा विश्वास अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी व्यक्त केला आहे.

 

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

दिपळ वळसे पाटलांना विजयाचा विश्वास

आंबेगाव तालुक्यतून सलग सात वेळा आमदार झालेले दिलीप वळसे पाटील हे आठव्यांदा आंबेगाव मतदार संघातून निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांनी आज मतदानाच हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विजय माझ्याच होईल असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या जनतेला मतदानाचे आवाहन

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागांसाठी मतदान होत आहे.राज्यातील सर्व मतदारांना माझे आग्रहाचे आवाहन आहे की त्यांनी उत्साहाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी.यावेळी सर्व तरुण आणि महिला मतदारांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन मतदान करावे.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांनी लातूरच्या बाबळगाव या त्यांच्या मुळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.

उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम बंद

उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात कस्तुरबा नगर परिसरात विनयालय शाळेमधील मतदान केंद्रावर सकाळीच ईव्हीएम बंद पडली आहे. यामुळे या ठिकाणी मतदान काही काल खोळंबले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

सांगलीच्या तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आर आर पाटील यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. आई सुमनताई पाटील यांच्यासह त्यांनी अंजनी इथल्या मुळ गावी मतदान केले.

राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी

अहमदनगर - ५.९१ टक्के,अकोला - ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव - ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक - ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे - ५.५३ टक्के,रायगड - ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली - ६.१४ टक्के,सातारा - ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के,सोलापूर - ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा - ५.९३ टक्के,वाशिम - ५.३३ टक्के,यवतमाळ - ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

पुणे जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.५३ टक्के मतदान

वडगाव शेरी 6.37%

शिवाजीनगर 5.29%

पुणे कॅन्टोन्मेंट 5.53%

पर्वती 6.30%

कोथरूड 6.50%

खडकवासला 5.44%

कसबा 7.44%

हडपसर 4.45%

मुंबईतील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान

maharashtra vidhansabha : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ ला सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे.

विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)

धारावी - ०४.७१ टक्के

सायन-कोळीवाडा - ०६.५२ टक्के

वडाळा – ०६.४४ टक्के

माहिम – ०८.१४ टक्के

वरळी – ०३.७८ टक्के

शिवडी – ०६.१२ टक्के

भायखळा – ०७ .०९ टक्के

मलबार हिल – ०८.३१ टक्के

मुंबादेवी - ०६.३४ टक्के

कुलाबा - ०५.३५ टक्के

काटेवाडी येथे मतदान केल्यावर माध्यमांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री अजित पवार
काटेवाडी येथे मतदान केल्यावर माध्यमांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री अजित पवार

संभाजीनगरच्या कन्नत तालुक्यातील एका मतदान केंद्रावर मतदानासाठी बहिष्कार

संभाजीनगरच्या कन्नत तालुक्यातील एका मतदान केंद्रावर मतदानासाठी बहिष्कार टाकण्यात आला आहे. या मतदान केंद्रावर मतदानासाठी कुणीही आले नसल्याने शुकशुकाट आहे. सर्व ग्रामस्थांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात पायाभूत सुविधा नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात सकाळ पासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. नियंत्रण कक्षातून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतांना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे.
पुणे जिल्ह्यात सकाळ पासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. नियंत्रण कक्षातून निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवतांना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे.

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवार यांचं महत्वाचं व्यक्तव्य

अजित पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबाद व्यक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले, राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही सर्व निवडून आलेले आमदार व नेते एकत्र बसून चर्चा करू. या चर्चेतून मुख्यमंत्र्याची निवड करू.

बारामतीत युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Maharashtra Election live update : बारामतीत युगेंद्र पवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्या आई शर्मिला पवार यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

कोथरूड, कोल्हापूर, दादर, व येवला मतदार संघात काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड

Maharashtra Election : राज्यात सकाळी ७ पासून विधानसभा मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान सुरू होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान खोळंबले होते. पुण्यातील कोथरूड, कोल्हापूर, दादर आणि येवला मतदार संघात ही बिघाड झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी याची दखल घेत बिघाड दुरुस्त केला. मात्र, यामुळे मतदारांना रांगेत काही काळ उभे राहावे लागले.

बारामतीची जनता मला विजयी करे; अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Election : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार मतदान केल्यानंतर म्हणाले, "लोकसभा निवडणुकीतही आमच्याच कुटुंबातील दोन लोक एकमेकांच्या विरोधात उभे होते. ती निवडणूक सर्वांनी पाहिली आहे. यावेळीही ते घडले आहे, मला विश्वास आहे की बारामतीची जनता मला विजयी करेल.

Ajit Pawar : अजित पवरांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात बारामती मतदारसंघवार संपूर्ण देशाच लक्ष लागलं आहे. या मतदारसंघातील उमेदवार अजित पवार हे पत्नीसह काटेवाडी मतदान केंद्रावर पोहोचले असून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर सकाळी ७ च्या दरम्यान, अजित पवार पोहोचले. या ठिकाणी त्यांनी रांगेत लागून आपला मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. हडपसर येथील एका केंद्रात त्यांनी मतदान केले.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी सहपरिवार मतदान केले. जगताप ही हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी सहपरिवार मतदान केले. जगताप ही हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहन भागवत, अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यात मतदानाला सुरवात झाली आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूर येथे तर अजित पवार यांनी बारामतीची काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. राज्यात सकाळ पासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे.

Vidhan Sabha Election 2024: शायना एनसी यांनी मतदानापूर्वी घेतलं मुंबादेवीचं दर्शन

मुंबादेवीतून शिवसेना उमेदवार शायना एनसी निवडणुकीच्या रिंगणात आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांनी मतदान करण्यापूर्वी मुंबादेवीचं दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मध्यमांशी संवाद साधला व विजयाचा विशास व्यक्त केला.

Vidhan Sabha Election 2024 : संदीप नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

बेलापूर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला आहे. येथील मतदान केंद्रावर येत त्यांनी सपत्नीक मतदान केले. यावेळी नागरिकांनी मतदान करून आपला हक्क बजावावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

Vidhan Sabha Election 2024 : अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघात चुरशीची लढत

अकोला जिल्ह्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अकोल्यात १६ लाख ३७ हजारांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून या साठी प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे.

मतदानाला सुरुवात; अनेक ठिकाणी मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा

राज्यात लोकशाहीचा उत्सव सुरू झाला आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काही मतदान केंद्रांवर सकाळ पासून मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र होतं. बारामती येथे कतेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत युगेंद्र पवार व अजित पवार हे मतदान करणार आहेत.

 

निवडणूक आयोगामार्फत जय्यत तयारी

राज्यात मतदान वाढावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. राज्यात गैरप्रकार टाळण्यासाठी व परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदारांना सहजतेने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यादृष्टीने निवडणूक यंत्रणेमार्फत विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्यने निवडणूक विभागाच्या संकेतस्थळावर तसेच वोटर्स ॲपवर मतदारांना आपला निवडणूक ओळखपत्राचा अंक टाकून किंवा स्वतःचे नाव किंवा मतदार नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे या ॲपवर आपले नाव मतदार यादीत शोधणे तसेच मतदान केंद्र याची माहिती सहजतेने मिळू शकते.

सकाळी ७ वाजता होणार मतदानाला सुरुवात

आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. राज्यातील ९.७ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी राज्यातील १ लाख ४२७ मतदान केंद्र सज्ज झाली आहेत.

पुण्यात माजी नगरसेविका यांच्या पतीवर हल्ला

विधानसभा मतदानाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वडगाव शेरी मध्ये चंद्रकांत टिंगरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती असून त्यांनी ६ दिवसांपूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

Whats_app_banner