Maharashtra Election Live: महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. २८८ विधानसभा मतदारसंघ आणि १३ राज्यांमधील पोटनिवडणुकांचे निकालही आज जाहीर होणार आहेत. या मतमोजणीची क्षणोक्षणीची माहिती आपल्याला या लाइव्ह आर्टिकलमध्ये मिळेल.
राज्यात महायुतीचा मोठा विजय झाला आहे. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. २०० पेक्षा अधिक जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून ६० जागाही जिंकू शकते नाहीत.
पुण्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल १ लाख ११ हजार मतांनी दणदणीत विजयी मिळवला असून हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य आहे.
माहीम मतदारसंघातून राज ठाकरे याचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे. या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत हे जायंट किलर ठरले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांचा पराभव झाला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर येथून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांचा विजय झाला आहे. त्यांचा सुमारे ३६ हजार मतांनी विजय झाला आहे. तर काँग्रेसचा उमेदवार परभुत झाला आहे.
संगमनेर येथून धक्कादायक निकाल आला आहे. काँग्रेसचे बडे नेते व मुख्यमंत्री पदाचे दावेदार बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे.
दादर – माहीम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हाती येत असलेल्या कलांनुसार अमित ठाकरे प्रचंड पिछाडीवर आहेत.
अहमदनगर शहर मतदारसंघात पंधराव्या फेरी अखेरीस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप २४२५९ मतांनी आघाडीवर आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर पिछाडीवर आहेत.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार विजय भांबळे १४ व्या फेरी अखेर ४५७८ मतांनी आघडीवर आहेत.
कणकवली येथून नीलेश राणे विजयी झाले आहेत. परळीमधून धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. हळूहळू निकालाचे चित्र आता स्पष्ट होत आहे.
पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर आहेत. सिद्धार्थ शिरोळे यांना ८२९८ मते मिळाली आहे. तर कॉँग्रेसचे दत्ता बहिरट हे ४४४० मतांनी आघाडीवर आहेत.
येवला मतदार संघातून छगन भुजबळ हे काही मतांनी पुढे आले आहेत. छगन भुजबळ हे मागे पडले होते. मात्र, आता ते पुढे आले आहेत.
विधानसभेचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदम हे पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या फेरीतून समोर आले आहे.
कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार रोहित पवार हे आघाडीवर आहे. त्यांना ५५७७ मते मिळाली आहे. तर भाजपचे प्रा राम शिंदे यांना ५२८९ मते मिळाली असून ते २८८ मतांनी मागे आहेत.
बारामतीत पहिल्या फेरीत अजित पवारांना ९२९१ मतं, तर युगेंद्र पवारांना ५६६८ मतं मिळाली आहे. तब्बल ३ हजार ६२३ मतांनी अजित पवार आघाडीवर आहेत.
पुण्यातील कसबा पेठेत रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत. भाजपचे रासने हे पुढे आले आहे. थोड्या वेळापूर्वी धंगेकर हे आघाडीवर होते. मात्र, रासने यांनी आघाडी घेलती आहे.
पुण्यातील कोथरूड येथून भाजपचे चंद्रकांत पाटील हे पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. त्यांना ८१०१ मत मिळाली आहे. तर त्यांचे विरोधक चंद्रकांत मोकाटे यांना २३५२ मते मिळाली आहे. तर किशोर शिंदे यांना ५२९ मते मिळाली आहे. पाटील यांचे मताधिक्य ५७४९ मिळाले आहे.
छत्रपती संभाजीनगर विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट हे पिछाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर संजय शिरसाट हे सुरुवातीपासून त्यांच्यासोबत होते व ठाकरेंच्या शिवसेनेवर आक्रमकपणे टीका करत होते.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांचं आव्हान आहे.
कोल्हापूरमधील कागल मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ पिछाडीवर गेले आहेत. तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजित घाटगे यांनी आघाडी घेतली आहे. शरद पवार यांनी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. तिथल्या अंतिम निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.
बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व मंत्री धनंजय मुंडे हे २ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार राजेश लाटकर हे आघाडीवर आहेत. मधुरिमाराजे भोसले यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीनं लाटकर यांना पाठिंबा दिला होता.
मुंबईतील वरळी मतदारसंघातून माजी मंत्री व ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहेत. तर, येवल्यात छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे. ते पिछाडीवर गेले आहेत.
ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू झाली असून कल वेगानं बदलण्यास सुरुवात झाली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी पुन्हा आघाडी घेतली आहे. तर, कणकवली व कुडाळमध्ये नीतेश राणे व नीलेश राणे हे दोघेही आघाडीवर आहेत.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील पिछाडीवर गेले आहेत. तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांनी आघाडी घेतली आहे.
मुंबईतील घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पराग शाह आघाडीवर आहेत. पराग शाह हे राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांचं आव्हान आहे.
पोस्टल मतमोजणीत बारामती मतदारसंघात अजित पवार यांना धक्का बसला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली आहे.
मुंबईतील माहीम मतदारसंघातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे आघाडीवर आहेत. सदा सरवणकर व महेश सावंत यांचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजन तेली आघाडीवर आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.
Maharashtra Election Live : राष्ट्रवादीचे कमलकर अहमदनगर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात महायुती पाच जागांवर तर महाविकास आघाडी पाच जागांवर आघाडीवर आहे. तर झारखंडमध्ये एनडीए पाच जागांवर तर जेएमएम-काँग्रेस आघाडी तीन जागांवर पुढे आहे.
Maharashtra Election Live : पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पुणे कॅन्ट जागेवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपच्या सुनली कांबळे यांनी आघाडी घेतली आहे. याशिवाय गोंदिया आणि चिरोलीमधून काँग्रेस आघाडीवर आहे.
Maharashtra Election Live : महाराष्ट्रात आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार, महाविकास आघाडी १२ जागांवर तर महायुती १५ जागांवर आघाडीवर आहे. झारखंडमध्ये काटे की टक्कर सुरू आहे. सुरू आहे. पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत झारखंडमध्ये दोन्ही आघाडी प्रत्येकी १० जागांवर पुढे आहेत. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपापल्या जागेवरून आघाडीवर आहेत.
काँग्रेसप्रदेशाध्यक्ष नाना पटोले आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यूगेंद्र पवार आघाडीवर आहे.
Kolhapur kagal update : कोल्हापूर मधील कागल येथील अपडेट पुढे आले आहेत. कागल येथून समरजीत घाडगे आघाडीवर आहेत तर हसन मुश्रीफ पिछाडीवर असल्याची माहीती आहे.
बारामतीयेथील पहिला निकाल हाती आला असून यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार पुढे असल्याची माहिती आहे. सध्या पोस्टल मतदान सुरू झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. हाती आलेल्या निकालानुसार भाजपा आघाडीवर असल्याची माहिती आहे. सातारा जिल्ह्यातील शिवेंद्रराजे भोसले आणि नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी निवडणूक आयोगानं https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाइट तयार केली आहे. आज सकाळी ८ वाजेपासून या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची क्षणोक्षणीची माहिती जाणून घेता येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतदानाची मोजणी होईल.
Maharashtra Election Live: महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका २०२४ च्या मतमोजणीला शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी भाजप प्रणित महायुती आणि सत्तेत परतण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यातील लढतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Election Result: सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या त्यांच्या जुन्या व्यक्तव्याबद्दल आठवण करून दिली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ट्विट केले आहे. या त्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांपैकी एकही जण पडणार नाही, तसे झाल्यास मी राजकारण सोडेन असं म्हटलं होतं. याच वक्तव्याची सुषमा अंधारे यांनी आठवण करून दिली आहे.
Maharashtra Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत. भारतीय निवडणूक आयोग आज शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू करेल आणि पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीनंतर ट्रेंड येण्यास सुरुवात होईल. राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते. विशेष म्हणजे राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याने 30 वर्षांचा विक्रम मोडला गेला.
महाराष्ट्रातील राजकीय लढत प्रामुख्याने सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात आहे. एकीकडे, महाआघाडीत भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT), ज्येष्ठ नेते शरद पवार यांची NCP (SP) आणि काँग्रेस हे आहेत.
Maharashtra Election Result: ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा जागेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार केदार दिघे यांनी शुक्रवारी मतदानोत्तर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला, ज्यामध्ये मतदान साहित्य निरीक्षण कक्षात ठेवण्या ऐवजी 'स्ट्राँग रूम'मध्ये ठेवण्यात आले होते. दिघे म्हणाले, 'पोस्टल बॅलेट असलेल्या लिफाफ्यांना सीलबंद केले नव्हते. निवडणूक आयोगाने या गैरप्रकारांची चौकशी करून कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांनी त्या जागेवर फेरमतदान घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महायुती आघाडीत भारतीय जनता पक्षाने १४९ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते, शिवसेना शिंदे गटाने ८१ जागांवर आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ५९ जागांवर उमेदवार उभे केले होते. तर विरोधी महाविकास आघाडीमध्ये, काँग्रेसने १०१ उमेदवार, शिवसेना (उबाठा) ९५ आणि राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) ८६ उमेदवार उभे केले. बहुजन समाज पार्टी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) सारख्या पक्षांनीही निवडणूक लढवली, ज्यामध्ये बसपने २३७ उमेदवार उभे केले आणि एआयएमआयएमने १७उमेदवार उभे केले. (एजन्सी)
Maharashtra Election Result: मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे सचिव सचिन शिंदे यांनी शुक्रवारी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब) ठाकरे यांच्यासोबत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर त्यांनी समर्थकांसह पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे सचिन माहीम येथून आला असून येथे शिवसेना यूबीटी, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
Maharashtra Election Result: काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी शुक्रवारी सांगितले की, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांना बहुमत मिळेल. यानंतर आजच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यात येणार आहे.
Maharashtra Election Result: वंचित बहुजन आघाडी (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी जाहीर केले की जर त्यांच्या पक्षाने पुरेशा जागा जिंकल्या तर ते सत्तेत राहणे पसंत करतील. महाराष्ट्रात पुढील सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही युतीमध्ये सामील होतील. आंबेडकर यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'जर उद्या वंचित बहुजन आघाडीला सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले तर आम्ही त्याच्यासोबत राहण्यास प्राधान्य देऊ. आम्ही सत्ता निवडू! आम्ही सत्तेत राहण्याचा निर्णय घेऊ!'
'ॲक्सिस माय इंडिया' आणि 'टूडेज चाणक्य' या दोन प्रमुख संस्थांनी महाराष्ट्रात 'महायुती'ला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 'आजचा चाणक्य'चा अंदाज आहे की महायुतीला १७५ जागा मिळवून आपली सत्ता कायम ठेवेल, तर एमव्हीएला केवळ १०० जागांवर समाधान मानावे लागेल. 'ॲक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १७८ ते २०० जागा मिळू शकतात, तर एमव्हीएला केवळ ८२ ते १०२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra Election Live: ठाण्याच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा जागेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांनी शुक्रवारी मतदानोत्तर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप केला, ज्यात मतदान साहित्य 'स्ट्राँग रूम'मध्ये ठेवण्यात आले होते. 'निरीक्षण कक्षात ठेवण्याऐवजी. निरीक्षण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नसल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी त्याने काही व्हिडिओही पत्रकारांना दाखवले. दिघे म्हणाले, “पोस्टल बॅलेट असलेल्या लिफाफ्यांना सीलबंद केलेले नाही. निवडणूक आयोगाने या गैरप्रकारांची चौकशी करून कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. त्यांनी त्या जागेवर फेरमतदान घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
Maharashtra Election Live: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी विरोधी महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील, शिवसेनेचे (यूबीटी) राज्यसभा सदस्य संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) प्रदेश प्रमुख जयंत पाटील उपस्थित होते.
Maharashtra Election Live: शिवसेना (UBT) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी महायुती पक्षांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी हॉटेल आणि हेलिकॉप्टर बुक केल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, ‘महायुती महाराष्ट्रातील जनतेला पुढील ५० वर्षे सुट्टी देणार आहे. जनता आम्हाला (महा विकास आघाडी) बहुमत देईल आणि आम्ही पुढील ५ वर्षे जनतेची सेवा करत राहू. त्यांचे (महायुती) सरकार जाणार आहे, म्हणून कदाचित ते हेलिकॉप्टर वगैरे बुक करत असतील कारण त्यांना माहित आहे की हरल्यावर जनता त्यांच्याकडे ’हिशोब मागतील'
Maharashtra Election Live: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून अभिनंदन करणारे दाखवणारे पोस्टर पुण्यात लावण्यात आले. मात्र, काही वेळाने हे पोस्टर काढण्यात आले. पक्षनेते संतोष नांगरे यांनी हे पोस्टर लावले असल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Election Live: पिंपरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया २३ नोव्हेंबर २०२४ रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील वेटलिफ्टिग हॉल येथे होणार असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली आहे. या मतमोजणीसाठी एकूण २४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मतमोजणीसाठी वीस आणि टपाली मतपत्रिकेसाठी तीन व इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमसाठी (इटीपीबीएस) एका टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.
उमेदवारांनी टेबलनिहाय मतमोजणी प्रतिनिधीची नेमणूक करावी. उमेदवार, नेमणूक करण्यात आलेले मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ओळखपत्र देण्यात येतील. त्यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही श्रीमती यादव म्हणाल्या.
मतमोजणीच्या एकूण २० फेऱ्या होणार आहेत. निवडणूकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रांमध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे याची उमेदवार प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.
Maharashtra Election Live: दिनांक २२ रोजी दुपारी ३ वाजता मतमोजणी प्रक्रियेसाठी नेमणूक केलेले मोजणी पर्यवेक्षक, मोजणी सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक यांना निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणीच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असून त्याशिवाय मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळणार नाही तसेच मोबाईल आणण्याची परवानगी नसल्याची सूचना यावेळी देण्यात आली. टपाली मतमोजणी प्रक्रिया, इव्हीएम मतमोजणी प्रक्रिया इत्यादी सर्व विषयांची सखोल माहिती देण्यात आली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ देण्यात येणार असल्याची माहिती यादव यांनी दिली. दरम्यान, पिंपरी विधानसभा मतदारसंघात एकूण ५१.७८ टक्के मतदान झाले असून एकूण २ लाख ०२ हजार ७६६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये १ लाख ०५ हजार ३९७ पुरूष तर ९७ हजार ३६० महिला आणि ०९ इतर मतदारांचा समावेश आहे.
Maharashtra Election Live:पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी ५२८ सूक्ष्म निरीक्षक, ५५३ मतमो जणी पर्यवेक्षक तसेच ५७७ मतमोजणी सहायक असे १ हजार ६५८ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय राखीव ४५८ अधिकारी, कर्मचारी असे एकूण २ हजार १४३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघातील ८ हजार ४४३ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होणार आहे. मतमोजणी साठी जुन्नर ८७, आंबेगाव ८५, खेळ आळंदी ७७, शिरूर ९०, दौंड ५७, इंदापूर ६१, बारामती ७७, पुरंदर ५९, भोर ९७, मावळ ६६, चिंचवड ८७ ,पिंपरी ९८, भोसरी ८७, वडगाव शेरी ८९, शिवाजीनगर ६२, कोथरूड ८७, खडकवासला ८०, पर्वती ९३, हडपसर ९३, कॅन्टोन्मेंट ६० आणि कसबा पेठ ६६ याप्रमाणे अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास सक्त मनाई आहे. उमेदवार प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपुर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असेही निवडणूक प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.