'म्हातारं म्हातारीला चोळी शिवू द्यायचं नाही' भाजप नेते पाशा पटेल यांचे जाहीरसभेत अश्लील हातवारे, VIDEO
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'म्हातारं म्हातारीला चोळी शिवू द्यायचं नाही' भाजप नेते पाशा पटेल यांचे जाहीरसभेत अश्लील हातवारे, VIDEO

'म्हातारं म्हातारीला चोळी शिवू द्यायचं नाही' भाजप नेते पाशा पटेल यांचे जाहीरसभेत अश्लील हातवारे, VIDEO

Nov 16, 2024 12:17 AM IST

Pasha Patel : जाहीर सभेत अश्लिल हातवारे करत अतिशय खालच्या पातळीवरील भाषेचा वापर केल्याने पाशा पटेल यांच्यावर टीका केली जात आहे.

पाशा पटेल
पाशा पटेल

राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून अनेक नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. काही दिवसापूर्वी भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्या व्यंगावर टिप्पणी केल्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद उमटले होते. आता कर्जत जामखेड मतदारसंघात भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपचे नेते आणि मंत्री पाशा पटेल यांनी अश्लील हातवारे करून खूपच खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करत काँग्रेसवर टीका केली आहे.

जाहीर सभेत अश्लिल हातवारे करत अतिशय खालच्या पातळीवरील भाषेचा वापर केल्याने पाशा यांच्यावर टीका केली जात आहे.

पाशा पटेल म्हणाले की, मुसलमानांनी घाबरायचं कारण नाही. एका घरात एक म्हातारी आणि म्हातारं राहत होतं. अडचण अशी होती की म्हातारं म्हातारीला चोळी शिवू देत नव्हतं. एकेदिवशी मध्यरात्री २ वाजता एक चोर आला. चोर घरात शिरल्याबरोबर म्हातारी ठणणाणं बोलली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली. आता म्हाताऱ्याने चोराला धरून मारलं पाहिजे होतं. पण म्हाताऱ्याने असं काही केलं नाही. त्याने उलट चोराचे आभार मानले, महिन्यातून एक दोन वेळा घरी असंच येत जा. तू आल्या शिवाय ही माझ्या गळ्यात पडणार नाही. तसे हेहरामखोर काँग्रेसवाले मुसलमान गळ्यात पडावे म्हणून अयं…अयं… करतंय. असं बोलताना पाशा यांनी अश्लील हातवारे करत, तोंडानेही अश्लील आवाज काढले.

पाशा पटेल यांनी अंगविक्षेप करत केलेले भाष्य अगदी दुर्दैवी आहे,महायुतीच्या नेत्यांना काय झालंय,त्यांना कसली सत्तेची घमेंड आली आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

शिक्षक नावाला कलंक असलेले तीन गनंग – रोहित पवारांची टीका

शिक्षक हे पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता.. यांची ही ‘सुसंस्कृत’ भाषा बघा.. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल. मी जे म्हणतो यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचंय,त्याचाच हा ट्रेलर आहे. पण मला विश्वास आहे यांचा पिक्चर कर्जत-जामखेडची स्वाभिमानी जनता फ्लॉप केल्याशिवाय राहणार नाही.यांची भाषा ऐकवायला मलाही लाज वाटते पण यांची लायकी जगाला कळावी यासाठी नाईलाजाने आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने मी हा व्हिडिओ शेअर करतोय, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner