मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhusawal Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने भुसावळ हादरले; ३.३ रिश्टर स्केलची तीव्रतेची नोंद

Bhusawal Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने भुसावळ हादरले; ३.३ रिश्टर स्केलची तीव्रतेची नोंद

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 27, 2023 12:51 PM IST

Jalgaon Earthquake: जळगावच्या भुसावळ येथे आज सकाळी भूकंपाचे हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

Earthquake (Represantative Image)
Earthquake (Represantative Image)

Bhusawal Earthquake: जळगावच्या भुसावळमध्ये आज सकाळी भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सुदैवाने या भूंकपात कोणताही जिवीतहानी झाली नाही. परंतु, या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील नागिरकांना आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवले. त्यावेळी मोठा आवजही आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर नागरिक ताबडतोब घराबाहेर पडले. नाशिक येथील भूकंपमापन केंद्रात सकाळी १०.३५ वाजता हे हादरे बसल्याची नोंद करण्यात आली. तसेच या भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले जात आहे.

हिंगोली जिल्ह्यात दोन आठवड्यापूर्वी (८ जानेवारी २०२३) पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञानकडून ट्विट करत हिंगोली जिल्ह्यात पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसल्याची माहिती देण्यात आली होती.

WhatsApp channel