मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Crisis: “..तरच राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकेल”, जयंत पाटील

Maharashtra Crisis: “..तरच राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकेल”, जयंत पाटील

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 23, 2022 08:50 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीशिवसेनेतील बंडावरआपली प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील
जयंत पाटील

मुंबई –शिवसेनेतील जवळपास ४० आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली फुटून सरकार बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार वाचवण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी दिवसभर यासंदर्भात तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या. सरकारविषयी संभ्रमावस्था असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिवसेनेतील बंडावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यातून मार्ग काढतील -

जयंत पाटील यांनी म्हटले की, या परिस्थितीतून शरद पवार मार्ग काढतील. सरकार राहावं हीच आमची भूमिका आहे. शेवटपर्यंत हे सरकार टिकावं यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभं राहण्याचे निर्देश शरद पवारांनी आम्हाला दिले आहेत. अशा प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीतून शरद पवार नेहमीच मार्ग काढत आले आहेत.

आमदार ब्लॅक कॅट कमांडोंच्या घेरावात -

शिवसेनेचे फुटीर आमदार ब्लॅक कॅट कमांडोंच्या घेरावात अडकले आहेत. एका हॉटेलमध्ये किल्ल्याचं स्वरूप करून तिथे त्यांना ठेवलं आहे. जेव्हा हे आमदार मुंबईत येतील आणि उद्धव ठाकरेंसमोर जातील, तेव्हा हे चित्र बदलेल असा आम्हाला विश्वास आहे”, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.

 

बंडखोरीचं हिंदुत्व हे खरं कारण नाही -

दरम्यान,यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीमागचं खरं कारण योग्य वेळी सांगेन,असं सूचक विधान केलं आहे. “अशा गोष्टी होतच असतात. आमदारांची कामं कधी होतात,कधी होत नाहीत. वरिष्ठांच्या भेटी कधी होतात,कधी होत नाहीत. पण त्याचा परिणाम सरकारवर कधी होत नसतो. पण काही वेगळ्या कारणाने काही लोक बाजूला जात असतील,तर ती कारणं समोर येत नाहीत. फक्त हिंदुत्वाचा मुद्दा समोर येतो. पण खरं कारण काय आहे,ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगेन”,असं ते म्हणाले.

सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेचे आमदार ठिकवणं म्हत्वाचं -

आज हे सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेच्याच आमदारांना टिकवणं महत्त्वाचं पण अडचणीचं झालं आहे. परिस्थिती बदलली आहे. शिवसेना एकगठ्ठा राहिली,तर आजही हे सरकार टिकेल. शरद पवार स्वत: त्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटून आले आहेत”,असं पाटील यांनी सांगितलं.

WhatsApp channel

संबंधित बातम्या