मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Corona : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढ सुरुच, सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई-पुण्यात
Maharashtra Corona
Maharashtra Corona

Maharashtra Corona : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढ सुरुच, सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई-पुण्यात

01 April 2023, 0:12 ISTShrikant Ashok Londhe

Maharashtra coronavirus : राज्यात आज ४२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे.

Maharashtra coronavirus update : देशात आज तीन हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळून आली. गेल्या सहा महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.राज्यात आज ४२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोरोनामुळे राज्यात आज एकाही मृत्यूची नोंद नसून राज्यातील मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका आहे. राज्यात आज ३५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.१४ टक्के झाले आहे.

राज्यात सध्या कोरोनाचे ३०९० सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे ९३७ सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल पुण्यात ७२६ तर ठाण्यामध्ये ५६६ सक्रिय रुग्ण आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आज एका दिवसात कोरोना संक्रमित ३,०१६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

यापूर्वी २ ऑक्टोबर २०२२ रोजी कोरोनाचे ३,३७५ रुग्ण आढळले होते. याशिवाय शुक्रवारी १,३९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सक्रीय रुग्णसंख्या आता १५ हजार २०८ वर पोहोचली आहे.

विभाग