मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत ९९.६३% रुग्ण Omicron sub variant ने बाधित; राज्यात सोमवारी २३६९ नवे रुग्ण

मुंबईत ९९.६३% रुग्ण Omicron sub variant ने बाधित; राज्यात सोमवारी २३६९ नवे रुग्ण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jun 27, 2022 09:23 PM IST

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातीलदैनंदिन नव्या रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. त्यातच मुंबईतील ९९.६३ टक्के रुग्ण ओमायक्रॉन सब व्हेरिएंटने बाधित असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

मुंबई -राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील दैनंदिन नव्या रुग्णांपैकी सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोनाचा एक रिपोर्ट जारी केला आहे. मुंबईतील कोरोनाच्या जिनोम सिक्वेसिंगचा हा रिपोर्ट आहे. ज्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या जीनोम सिक्वेसिंगच्या (Mumbai coronagenome sequencing) एकूण नमुन्यांपैकीतब्बल ९९.६३टक्के नमुने हे ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंटने बाधित असल्याचे समोर आले आहे(Mumbai Omicron sub variant).

कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १३ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष समोर आले आहेत. या १३ व्या फेरीतील चाचण्यांसाठी ३६७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २६९ नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे मुंबई महानगर क्षेत्राबाहेरील होते. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील २६९ नमुन्यांपैकी २६८ अर्थात ९९.६३% नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे, तर एक नमुना हा इतर उपप्रकाराने बाधित आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

 

राज्यात २३६९ नवे रुग्ण, पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू -

राज्यात सोमवारी २३६९ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण १४०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत आज सर्वाधिक म्हणजे १०६२ रुग्णांची भर पडली आहे.राज्यात आज पाच कोरोनाबाधित रुग्णाने आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा १.८५ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७७,९१,५५५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.८३ टक्के इतके झाले आहे.

राज्यात एकूण २५,५७० सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे १२,४७९ इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये ५८७१ सक्रिय रुग्ण आहेत.

WhatsApp channel

विभाग