Weather News: महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेले आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील तापमानात किंचित बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, थंडी कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. वाढत्या थंडीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या २४ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम असणार आहे. मात्र, त्यानंतर २५ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत राज्यातील तापमान वाढ होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होईल. राज्यात परभणी, निफाड, जेऊन, अहिल्यानगर आणि नांदेडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली.
महाराष्ट्रात धुळे, परभणी, निफाड, जेऊर, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर गोंदिया, भंडारा आणि वर्धा या ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवण्यात आले.
पुणे ३२.२ (१२.५), अहिल्यानगर (९.७), धुळे ३०.५ (७), जळगाव २९.६ (९.५), जेऊर ३३ (११), कोल्हापूर ३०.१ (१७.६), महाबळेश्वर २७.२ (१२.२), मालेगाव २७.७ (१२.२), नाशिक ३१.२ (१०.७), निफाड २९.८ (८४), सांगली ३१.४ (१७), सातारा ३१.७ (१४.६), सोलापूर ३४ (१७.४), सांताक्रूझ ३१.४ (१८.५), डहाणू २९.३ (१६.१), रत्नागिरी ३३.८ (१९.६), छत्रपती संभाजीनगर ३०.५ (१२.४), बीड २९ (-), धाराशिव ३०.३ (१२.२), परभणी ३०.९ (१४.५), परभणी कृषी विद्यापीठ २९ (१२.४), अकोला ३०.३ (१२.८), अमरावती ३१.४ (१५.१), भंडारा २८ (१४), बुलडाणा ३१ (१३.४), ब्रह्मपुरी ३३.६ (१३.१), चंद्रपूर २९.४ (-), गडचिरोली ३० (१५.४), गोंदिया २९.८ (१६.६), नागपूर ३०.२ (१६.१), वर्धा ३०.१ (१६.२), वाशीम २९.६ (१५), यवतमाळ ३०.५ (-).
भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राज्यातील जवळपास चार ते पाच जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २१ डिसेंबर ते २६ डिसेंबरदरम्यान पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत.
संबंधित बातम्या