Bollywood News: बॉलिवडू अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) मुंबईतील निवासस्थानाबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना आज (१४ एप्रिल २०२४) पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी कायदा हातात घेतला आहे, त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. तसेच सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून त्यांना काळजी करण्याची गरज नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पाच च्या सुमारास वांद्रे येथील अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. गोळीबाराच्या ३ राऊंडची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनास्थळी पोहोचली.
"ही दुर्दैवी घटना आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सलमान खान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. सलमान आणि त्यांच्या कुटुंबांना काळजी करण्याची आवश्यकता नाही", असे एकनाथ शिंदे म्हणाले.
"सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेबद्दल फडणवीस यांनी विरोधकांकडून चुकीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. या घटनेवरून विरोधकांकडून ज्या प्रकारे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची टीका केली जात आहे, ती योग्य नाही.”
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या धमकीनंतर नोव्हेंबर २०२२ पासून सलमान खानची सुरक्षा वाय- प्लसपर्यंत वाढवण्यात आली. सलमान खानला वैयक्तिक शस्त्र बाळगण्याची परवानाही देण्यात आली आहे. सलमान खानने नवीन बुलेटप्रूफ वाहनही खरेदी केले आहे.
सलमान खानला काही वर्षात सातत्याने धमक्या मिळत आहेत. त्यामुळे बॉलिवूडचा टायगर असलेला सलमान खान गँगस्टरच्या रडारवर का आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.
संबंधित बातम्या