Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले!-maharashtra cm eknath shinde on majhi ladki bahin yojana ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले!

Aug 16, 2024 09:02 AM IST

Eknath Shinde on Ladki Bahin Yojana: ठाण्यातील आदिवासी पाड्यात नागरिकांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले.

लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? जाणून घ्या मुख्यमंत्री काय म्हणाले?
लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? जाणून घ्या मुख्यमंत्री काय म्हणाले? (HT_PRINT)

Eknath Shinde News: महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. येत्या १७ ऑगस्ट लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हफ्ते जमा होणार आहे. मात्र, या योजनेवरून विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहिणींची दिशाभूल करण्यासाठी सरकारने ही योजना आणली. निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल, असेही विरोधक बोलत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

एकनाथ शिंदे यांनी आदिवाशी दिनानिमित्त काल ठाण्यातील आदिवासी पाड्यात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना विरोधकांवर टीका केली आहे. सरकारच्या लाडकी बहिण योजनेमुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले. ही योजना होणारच नाही, ते म्हणत आहेत. पण मी स्पष्टपणे सांगतो की, लाडकी बहीण योजना कायम राहणार आहे. त्यांच्या भुलथापांवर विश्वास ठेवू नका. ज्या ठिकाणी मी दौऱ्याला जातो, तेथील माझ्या लाडक्या बहीणी माझे स्वागत करून मला ओवाळतात, मला राखी बांधतात. त्याला नशीब लागते.आधी मला एकच सख्खी बहीण होती, आता माझ्या लाखो बहिणी आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा

लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांना तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. शासनाने या योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत ॲप’ सुरु केले आहे. हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरुन डाऊनलोड करता येणार आहे. याशिवाय, महिलांना ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे.

अर्ज भरण्याची पद्धत

- सर्वप्रथम प्ले स्टोरमध्ये जाऊन नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करा.

- ॲप डाऊनलोड झाल्यावर तुमची माहिती भरून प्रोफाईल तयार करा.

- नाव आणि इतर माहिती काळजीपूर्वक भरा

- योजनेसाठी अर्ज करणारी महिला कोणत्या कॅटेगिरीमध्ये ती माहिती भरा.

- मुख्यमंत्री ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याची माहिती भरा.

- अर्जदाराचा फोटो अपलोड करा.

- त्यानंतर लागणारी कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.

- अर्ज भरून पूर्ण झाल्यास तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल.