Ladki Bahin Yojana Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला जो घवघवीत यशाचा कौल मिळाला त्यात लाडक्या बहिणीं'चा आशीर्वाद मोलाचा ठरला आहे, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा बोलवून दाखवले. परंतु, या लाडक्या बहिणीच्या खात्यात पुढील हफ्ता कधी जमा होईल आणि किती रुपयांचा असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहिणी योजनेंतर्गत महिलांना मिळणाऱ्या हफ्यात वाढ केली जाईल, असे अश्वासन महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते.दरम्यान,विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
महायुती सरकारने आपल्या मागील काळातील अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरु झाली. जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर आचारसंहिता लागल्याने महिलांना डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळाला नाही. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होईल, असे महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. राज्यात महायुतीचे सरकार येऊन जवळपास महिना झाला. परंतु, अजूनही डिसेंबर महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नसून कधी जमा होणार? याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. फडणवीस म्हणाले की, महायुती सरकारने सुरु केलेली एकही योजना बंद होणार नाही. तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा होतील. आम्ही दिलेली सर्व आश्वासन पूर्ण केली जाणार आहेत. याबद्दल कोणतीही शंका नाही. याच बरोबर योजनेच्या निकषात कोणताही बदल केला जाणार नाही. पात्र, महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
विधानसभाआधी महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे अश्वासन दिले होते. यामुळे लाडक्या बहिणींना पुढील हफ्त्यात १५०० मिळतील की १५०० असा प्रश्न पडला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मात्र आधीप्रमाणेच १५०० रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना २१०० मिळू शकतील.
संबंधित बातम्या