Maharashtra Oath Ceremony: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात चोरांचा धुमाकूळ; १२ लाखांचा ऐवज लंपास
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Oath Ceremony: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात चोरांचा धुमाकूळ; १२ लाखांचा ऐवज लंपास

Maharashtra Oath Ceremony: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात चोरांचा धुमाकूळ; १२ लाखांचा ऐवज लंपास

Dec 08, 2024 10:40 AM IST

Maharashtra CM Oath Ceremony: महायुती सरकारचा गुरुवारी शपथविधी सोहळा गुरुवारी पार पडला. या सोहळ्यात चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात चोरांचा धुमाकूळ
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात चोरांचा धुमाकूळ (PTI)

Mahayuti Oath Ceremony News: महायुती सरकारचा गुरुवारी (५ डिसेंबर २०२४) शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात मनोरंजन, क्रिडा आणि उद्योगसह विविध श्रेत्रातील मोठ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली, जे अनेकांसठी आकर्षण ठरले. मात्र, महायुती सरकारच शपथविधी सोहळा आता भलत्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे. शपथविधी सोहळ्ण्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. या सोहळ्यात चोरट्यांनी १२ लाखाचा ऐवज लंपास केला.

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मोठ्या संख्येत नागरिकांनी मुंबईतील आझाद मैदानात गर्दी केली. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. मुंबई पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा तुकड्यांसह ४,००० जवानांचा फौजफाटा तैनात केल्या. कडेकोट बंदोबस्त असूनही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत नागरिकांच्या मौल्यवान वस्तू गायब केल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी एकूण १२ लाखांचा ऐवज लंपास केला, ज्यात सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि रोकड यांचा समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अधिकारी एस. अहमत अली यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी आझाद मैदानात तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. गेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री होते. तर, फडणवीस आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिंदे गटाला ५७ जागा, अजित पवार गटला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाने १० जागेवर विजय मिळवला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर