मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?

Dec 14, 2024 10:36 PM IST

Chief Minister Salary and Facilities: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मानधन मिळते? हे जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ते आमदार, कोणाला किती मानधन मिळते, तुम्हाला माहिती आहे का? (HT_PRINT)

Maharashtra News: नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीला मोठा विजय मिळाला. यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली झाले. तर, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले. आधी मुख्यमंत्री राहिलेले आणि नंतर उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांच्या मानधन किती रुपयांन कमी झाले असेल? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना १९५६ च्या कायद्यानुसार वेतन आणि भत्ते दिले जातात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दरमहा ३.४ लाख रुपये पगार मिळतो.

एकनाथ शिंदे यांना आता किती पगार मिळणार?

महाराष्ट्रातील आमदारांना महिन्याला २.३२ लाख रुपये मानधन मिळते. मंत्र्यांनाही तेवढाच पगार मिळतो. अशाप्रकारे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना महिन्याला २.३२ लाख रुपये मिळणार आहेत. आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पगारात १ लाख ८ हजारांनी कपात झाली आहे.

मुख्यमंत्र्यांना पगाराशिवाय कोणत्या सुविधा मिळतात?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर पगाराव्यतिरिक्त त्यांना अनेक प्रकारचे भत्ते आणि सुविधाही मिळतात. मुख्यमंत्र्यांना वार्षिक १० लाख अतिरिक्त भत्ता मिळतो. याशिवाय त्यांच्या सहाय्यकाला दरमहा २५ हजार रुपये मिळतात. इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांना त्यांच्या कार्यकाळात आणि त्यानंतर पुढील १५ दिवस भाडे न भरता शासकीय निवासस्थानी राहण्याची सुविधा मिळते.

महायुती सरकारचा शपथविधी सोहळा

महायुती सरकारचा काही दिवसांपूर्वीच शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. तर, फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते.

महायुतीला मोठे यश

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. तर, महाविकास आघाडीला केवळ ५० जागा जिंकता आल्या. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिंदे गटाला ५७ जागा, अजित पवार गटला ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाने १० जागेवर विजय मिळवला. तर, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (काँग्रेस- १३, ठाकरे गट- ९, शरद पवार गट-८) ३० जागा जिंकल्या होत्या. तर, महायुतीला १७ (भाजप-९, शिंदे गट-७, अजित पवार गट-१) जागेवर विजय मिळवता आल्या होत्या.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर