Cash for votes: विवांता हॉटेलमध्ये एकूण किती रक्कम सापडली? पोलीस चौकशीत खरा आकडा समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cash for votes: विवांता हॉटेलमध्ये एकूण किती रक्कम सापडली? पोलीस चौकशीत खरा आकडा समोर

Cash for votes: विवांता हॉटेलमध्ये एकूण किती रक्कम सापडली? पोलीस चौकशीत खरा आकडा समोर

Nov 19, 2024 09:01 PM IST

Maharashtra Cash-For-Vote: विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी विनोद तावडे यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बीव्हीएचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला.

विवांता हॉटेलमध्ये एकूण किती रक्कम सापडली? वाचा
विवांता हॉटेलमध्ये एकूण किती रक्कम सापडली? वाचा (PTI)

Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी पाच कोटी रुपये वाटण्यासाठी हॉटेलमध्ये आले होते, असा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. 'कॅश फॉर व्होट'च्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालघर प्रशासनाने केलेल्या कारवाईत पोलीस पथकाला हॉटेलमध्ये जवळपास १० कोटी रुपयांची रोकड आणि काही अवैध कागदपत्रे सापडली.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले की, विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते रोख रक्कम वाटप करत असल्याच्या बीव्हीए कार्यकर्त्यांच्या तक्रारी निवडणूक विभागाकडे आल्या. या तक्रारीच्या आधारे निवडणूक अधिकारी आणि पोलीस पथकाने सहपोलीस आयुक्त आणि दोन पोलीस उपायुक्त यांच्यासह हॉटेलची झडती घेतली असता त्यांना ९ लाख ९३ हजार रुपयांची रोकड आणि काही अवैध कागदपत्रे आढळून आली. याप्रकरणी रोख रक्कम बाळगणे, आचारसंहितेचे उल्लंघन करणे, बेकायदा पत्रकार परिषद घेणे आदी गुन्ह्यांसाठी एफआयआर दाखल करण्यात आला.

विनोद तावडेंवरील आरोप काय आहेत?

विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी विनोद तावडे यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पाच कोटी रुपये वाटल्याचा आरोप बीव्हीएचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला. मुंबईपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या विरारमधील एका हॉटेलमध्ये तावडे यांना रोख रकमेसह पाहिल्याचा ठाकूर यांनी दावा केला.

हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?

तावडे ही मोठी रोकड वाटण्यासाठी आले आहेत, अशी माहिती भाजपच्या एका नेत्याने मला दिली. त्या पक्षाचा एवढा महत्त्वाचा राष्ट्रीय पदाधिकारी असे करेल यावर माझा विश्वास बसत नव्हता, पण दुर्दैवाने ते खरे ठरले. या ठिकाणी एक डायरी आढळून आली, जी आम्ही माध्यमांना दाखवली.

नालासोपाऱ्यात बीव्हीए आणि भाजपमध्ये मुख्य लढत

आज हॉटेलमध्ये रोख रक्कम, डायरी आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. डायरीमध्ये नावे आणि दिलेल्या रकमेचा उल्लेख होता, असे ठाकूर यांनी सांगितले. नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बीव्हीएचे क्षितीज ठाकूर आणि भाजपचे राजन नाईक यांच्यात लढत आहे.

भाजपने विनोद तावडेवरील आरोप फेटाळले

विनोद तावडे आणि भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा शेवटचा प्रयत्न म्हणून बिनबुडाचा आरोप करण्यात आला आहे. विनोद तावडे हे आमचे राष्ट्रीय सचिव असून ते पक्षाची अनेक कामे पाहत आहेत. नालासोपारा मतदारसंघातील उमेदवाराने त्यांना सभेला उपस्थित राहण्यास सांगितले. कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रियेबाबत सूचना देण्यासाठी अशा बैठका घेतल्या जातात. हॉटेल आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासावे, अशी आमची मागणी आहे. पाच कोटी रुपये खिशात आणता येणार नाहीत. कोणी घेऊन जात असेल तर ते दिसेल. त्यांनी पुरावे दाखवावे, निराधार आरोप करू नयेत, असे भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर