Ladki Bahin Yojana: जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, लाडकी बहीण योजनेबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप-maharashtra case against ncp scp leader jitendra awhad for misleading people on ladki bahin yojana ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojana: जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, लाडकी बहीण योजनेबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana: जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, लाडकी बहीण योजनेबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप

Sep 06, 2024 01:35 PM IST

Jitendra Awhad: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांंच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Jitendra Awhad News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि शेतकऱ्यांना मदत याबाबत खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चुकीची माहिती पसरवून सरकारची बदनामी केल्याप्रकरणी संभाजीनगर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात बीएनएसकलम ३५३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या जीआरचा चुकीचा संदर्भ देत सरकारने आता आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना मदत देणे बंद केल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. १७ ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेला सुरुवात झाली. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० दिले जात आहेत. आर्थिक मदतीद्वारे महिलांचे सक्षमीकरण करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांनी काल लाडकी बहीण योजनेबाबत ट्विट केले होते. 'आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद करण्यात येणार आहे, यासंदर्भात महसूल व वन विभागाने परिपत्रक काढले आहे, 'लाडकी बहीण' चा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बसणार असून शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे 'लाडकी बहीण' योजनेसाठी वापरले जाणार आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.

शासनाच्या योजना बंद होणार नाहीत- एकनाथ शिंदे

ही योजना केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी लागू आहे. या निकषांनुसार अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठीच्या योजना बंद करण्यात येणार असल्याच्या वृत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंडन केले. ‘बहुमहत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना राबविल्यामुळे शासनाच्या विविध योजना बंद होणार नाहीत’, असे स्पष्ट केले.

आमचे सरकार बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे

मुख्यमंत्री लाडकी बहना योजना सुरू केल्यानंतर आठवडाभरानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले. आम्ही या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांना स्वावलंबी बनवायचे आहे’, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी काही बहिणींशी चर्चा केली आणि सांगितले की ते या पैशांचा उपयोग आपल्या मुलांना शिकविण्यासाठी, औषधोपचार करण्यासाठी आणि जे काही छोटे व्यवसाय करतात ते वाढविण्यासाठी करतील.'

 

विभाग