महायुतीतील नाराजीनाट्य संपेना! आधी खाते वाटप नंतर पालकमंत्रीपदावरून तर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीचे मंत्री नाराज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महायुतीतील नाराजीनाट्य संपेना! आधी खाते वाटप नंतर पालकमंत्रीपदावरून तर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीचे मंत्री नाराज

महायुतीतील नाराजीनाट्य संपेना! आधी खाते वाटप नंतर पालकमंत्रीपदावरून तर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीचे मंत्री नाराज

Dec 24, 2024 11:18 AM IST

Maharashtra Politics : राज्यात आधी मुख्यमंत्री पदावरून तर त्यानंतर खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू होते मात्र, आता सोमवारी मंत्र्यांच्या वाटप करण्यात आलेल्या बंगल्यावरून व दालनावरून नाराजी असल्याचं उघड झालं आहे.

महायुतीतील नाराजीनाट्य संपेना! आधी खाते वाटप नंतर पालकमंत्रीपदावरून तर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीचे मंत्री नाराज
महायुतीतील नाराजीनाट्य संपेना! आधी खाते वाटप नंतर पालकमंत्रीपदावरून तर आता बंगले व दालन वाटपावरून महायुतीचे मंत्री नाराज (Deepak Salvi)

Maharashtra Ministers Bungalow : विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळूनही व खातेवाटप होऊनही मंत्र्यांमध्ये नाराजीनाट्य हे सुरूच आहे. सध्या नाराजीचा नवा अंक समोर आला आहे. नाराजीचे कारण ऐकून तुम्ही देखील डोक्यावर हात मारून नेमकं चाललंय काय असे म्हणालं. सोमवारी नवीन मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटप करण्यात आले. मात्र, त्यांना मनाप्रमाणे व वाटप करण्यापूर्वी विश्वासात घेतले नसल्याने अनेक मंत्री हे नाराज असल्याची बाब पुढे आली आहे. या बाबत त्यांनी पक्षनेत्यांकडे तक्रारी देखील केल्या असून बंगले व दालन वाटपात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यावर १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. तब्बल ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. महायुतीने निवडणूक जिंकल्यावर खाते वाटापावरून मोठी नाराजी होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला. हे नाराजी नाट्य संपल्यावर आता नाराजीचा आणखी एक अंक सुरू झाला आहे. कारण आहे बंगले वाटप.

सोमवारी महायुतीच्या मंत्र्यांना बंगले आणि दालनाचे वाटप करण्यात आले. मात्र, काही मंत्री यांना आवडीचे बंगले व दालन न मिळाल्याने ते नाराज आहेत. काही बंगले व दालने हे वास्तुशास्त्राप्रमाणे नसल्याने तर काही अनलकी असल्याने हे बंगले आम्हाला नको अशी भूमिका काही मंत्र्यांनी घेतली असल्याची माहिती आहे. तसेच बंगले वितरित करण्यापूर्वी विश्वासात घेतले नाही अशी देखील माहिती आहे. या नाराज मंत्र्यांनी पक्षातील जेष्ठ नेत्याकडे या बाबत तक्रार केली आहे. हे बंगले बदलून मिळावे अशी मागणी काही नेत्यांनी केली आहे. दरम्यान, काही नेत्यांना जुनेच बंगले मिळाल्याने त्यांना नवे बंगले हवे आहेत.

कुणाला कोणता बंगला मिळाला ?

सोमवारी झालेल्या बंगले व दालन वाटपायानुसार महायुती सरकारमधील ६ राज्यमंत्र्यांपैकी मेघना बोर्डिकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांना मंत्रालयात दालन मिळाले नाही. त्यांना विधानमंडळाच्या पहिल्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे. तर मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पर्णकुटी बंगला देण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी बंगला मिळाला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिवगिरी बंगला देण्यात आला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना (क-८) विशाळगड बंगला दिला गेला आहे. चंद्रकांत पाटील यांना ब-१ सिंहगड बंगला देण्यात आला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला मिळाला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर