महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर पडली आहे रेड
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर पडली आहे रेड

महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर पडली आहे रेड

Updated Dec 16, 2024 07:52 AM IST

Maharashtra cabinet ministers : महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी काल नागपूर येथे पार पडला. या मंत्र्यांच्या यादीत ईडीच्या कचाट्यात सापडलेले अनेक मंत्री आहेत. यातील काहींच्या घरावर तर छापे देखील पडले आहेत.

महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर छापाही आहे पडला
महायुतीच्या मंत्रिमंडळात ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेते! एकाच्या घरावर छापाही आहे पडला

Maharashtra cabinet ministers : महाराष्ट्रात रविवारी महायुतीसरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. अनेक जुन्या दिग्गज नेत्यांना यावेळी डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीद्वारे चौकशी सुरू असलेले अनेक नेत्यांचा देखील मंत्रीपदाच्या यादीत समावेश आहे.  या नेत्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. रविवारी झालेल्या विस्तारात महायुतीचा सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला १९, शिवसेनेला ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रीपदे मिळाली. 

प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्या मागे या पूर्वी ईडीचा ससेमिरा लागला आहे. हे नेते  चौकशीच्या गर्तेत सापडली आहेत. एकाही नेत्याच्या नावाचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात पोहोचला नसल्याने त्यांच्याविरोधात चौकशी सुरूच असल्याचे संकेत मिळत आहेत. यात भाजपचे गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे.  सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून त्यांची चौकशी सुरू होती.   

ईडीने मनी लाँडरिंगचा आरोप केलेले धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि सरनाईक तेव्हा विरोधी पक्षात होते. त्यानंतर ते  सरकारमध्ये सामील झाले. या प्रकरणी त्यांच्याविरोधात खटले सुरू असून कंपन्या आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांविरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यातील २८८ पैकी २३० जागा जिंकल्या होत्या.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाजन यांच्यावर खंडणी आणि अपहरणाचे आरोप झाले होते. या प्रकरणाचा तपास  सीबीआयद्वारे करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती.  शिंदे सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले. महाजन यांना सीबीआयने क्लीनचीट दिली आहे.  या प्रकरणी सीबीआयने आयपीएस अधिकारी भाग्यश्री नावटके आणि इतरांविरोधात आरोप दाखल केले आहे. 

ईडीने मुश्रीफ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोप करत त्यांच्या अनेक संस्था व घरावर  छापे टाकले आहेत. पूस गावातील १७ एकर भूखंडावरून मुंडे यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. हा भूखंड यापूर्वी बेलखंडी मठाच्या पुजाऱ्याला भेट म्हणून देण्यात आला होता.  तर सरनाईक यांच्यावर देखील मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर