मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी महत्त्वाचे निर्णय; मुख्यमंत्र्यांकडून यादी जाहीर!

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी महत्त्वाचे निर्णय; मुख्यमंत्र्यांकडून यादी जाहीर!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Sep 16, 2023 03:16 PM IST

maharashtra cabinet meeting: संभाजीनगरात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

maharashtra cabinet meeting
maharashtra cabinet meeting

75th Anniversary of Marathwada Liberation Day: मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याच्या ७५व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात आज (१६ सप्टेंबर २०२३) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. “आम्ही फक्त घोषणा करत नाहीत तर, अमलबजावणी करतो”, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

संभाजीनगरात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची एकनाथ शिंदेंनी माहिती दिली. एकनाथ शिंदे म्हणाले की, “मराठवाड्यातील जनतेला न्याय देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. राज्य सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्याला विकासाच्या दिशेने मोठी झेप घेता येणार आहे. आमच्या सरकारने वर्षभरात सर्वसामान्यांचे हीत डोळ्यासमोर ठेऊण निर्णय घेतले आहेत. आम्ही फक्त घोषणा करत नाहीत तर अमलबजावणी करतो.”

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय

- आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सिंचनासाठी साखळी सिमेंट बंधारे

- अंबड प्रवाही योजना दिंडोरी जिल्हा नाशिक आज १४ हजार कोटी रुपयांचे निर्णय फक्त सिंचनासाठी घेतले.

- पश्चिमवाहिनी नद्याद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याबाबतचा निर्णय (१३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित)

- ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली.

- सार्वजनिक बांधकामविभागामध्ये १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख दिले.

- महिला सक्षमीकरणावर चर्चा झाली.

- आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करु

- कृषी, क्रीडा. पर्यटनासह सर्व विभागाला निधी

- मराठाड्याती ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणार (२८४ कोटींचा निधी लागणार)

- पुणे संभाजीनगर मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवणे (१८८ कोटींचा निधी)

- पैठणमधील संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्यासाठी १५० कोटींचा निधी जाहीर

- शनी देवगाव उच्च पातळी बंधारा (२८५ कोटी)

- परभणीच्या पाथरीतील साईबाब तीर्थक्षेत्र विकास आराखडा (९१.८० को)

- औढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा विकास (६० कोटी)

- मराठवाड्यात दूध उत्पादनाला वेग देण्यासाठी ३ हजार २२५ कोटी रुपयांची निधी

- वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांना किमान ५ आणि कमाल १० दुधाळ जनावरांचे वाटप

- एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप

- मराठवाड्यातील १ हजार ३० कि मी लांबीच्या ३१ रस्त्यांची सुधारणा

छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठक झाली. स्मार्ट सिटी सभागृहात पार पडलेल्या बैठकीत पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

WhatsApp channel