Cabinet Meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता भाजप आमदाराच्या बँकेतून! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २ मोठे निर्णय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Cabinet Meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता भाजप आमदाराच्या बँकेतून! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २ मोठे निर्णय

Cabinet Meeting : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आता भाजप आमदाराच्या बँकेतून! मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २ मोठे निर्णय

Jan 02, 2025 04:55 PM IST

Cabinet Meeting Decisions : खातेवाटपानंतर पार पडलेल्या या पहिल्याच बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासह पड जमिनीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठक निर्णय
मंत्रिमंडळ बैठक निर्णय

Maharashtra cabinet meeting decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची नव्या वर्षातील पहिली मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. खातेवाटपानंतर पार पडलेल्या या पहिल्याच बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासह पड जमिनीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय बैठकीत घेण्यात आले. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबै बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसंच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठीचे निकष शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आले.

बीडमधील वाल्मिक कराड प्रकरणात आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले व आरोपांची राळ उठलेले मंत्री धनंजय मुंडे या बैठकीला हजर असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी १२ वाजता झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबै बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली. मुंबै बँक ही भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित असल्यामुळे विरोधक यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

-महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६च्या कलम-२२० मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय (महसूल विभाग).

-शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसेच महामंडळ,सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी.

मंत्रिमंडळ बैठकीत अन्य निर्णय -

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडण्यास तसंच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीस प्राधिकृत करण्यास मंजुरी आणि त्यासाठीचे निकष शिथिल करण्यात आले आहेत.

शासन जमा झालेल्या राज्यातील ४ हजार ८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार असून त्याचा राज्यातील तब्बल ९६३ शेतकऱ्यांना होणार फायदा होणार आहे. राज्यातील ९६३ शेतकऱ्यांच्या ४ हजार ८४९ एकर जमिनी शासन जमा झाल्या होत्या.

 

प्रवीण दरेकरांकडून सरकारचे आभार -

मुंबै बँकेला व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल प्रवीण दरेकर यांनी शासनाचे आभार व्यक्त केले. ज्या जिल्हा बँकांना सलग अ वर्ग आहे, त्यांना शासनाच्या व्यवहारांना परवानगी असते. या निकषात मुंबै जिल्हा बँक येत असल्यामुळे आणि अनेक सरकारी योजनांना, उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेची मदत झाली आहे, असं दरेकरांनी म्हटले.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर